Share Market : नवीन वर्ष २०२६ च्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला. सिगरेट आणि तंबाकू उत्पादनांवर लागू झालेल्या नवीन अबकारी कराचा मोठा फटका 'आयटीसी'च्या शेअर्सला बसला, ज्यामुळे सेन्सेक्सवर दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२ अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८५,१८८.६० वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मात्र १६.९५ अंकांच्या वाढीसह २६,१४६.५५ या स्तरावर पोहोचला.
आयटीसीमध्ये १० टक्क्यांची मोठी घसरणआजपासून तंबाकू उत्पादनांवर तात्पुरत्या लेव्हीऐवजी कायमस्वरूपी 'एक्साईज ड्युटी' लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दिग्गज कंपनी आयटीसीचे शेअर्स आज ९.६९ टक्क्यांनी कोसळले. आयटीसीमधील या मोठ्या विक्रीमुळे सेन्सेक्सला आज हिरव्या निशानमध्ये बंद होता आले नाही.
एनटीपीसी आणि महिंद्रा शेअर्सची चमकसेन्सेक्समधील ३० पैकी २२ कंपन्यांचे शेअर्स आज वधारले. यामध्ये सरकारी वीज कंपनी एनटीपीसी २.०८ टक्क्यांच्या वाढीसह अव्वल ठरली. त्यापाठोपाठ एटरनल (२.०५%), महिंद्रा अँड महिंद्रा (१.४०%) आणि एल अँड टी (१.३८%) या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिलासा दिला.
क्षेत्रीय कामगिरी आणि दिग्गज शेअर्सतेजीमधील शेअर्स : टाटा स्टील (१%), टेक महिंद्रा (०.९८%), इन्फोसिस (०.८१%), टीसीएस (०.६६%) आणि रिलायन्स (०.३५%) या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज खरेदी दिसून आली. बँकिंग क्षेत्रात कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय किरकोळ नफ्यात बंद झाले.घसरणीमधील शेअर्स : आयटीसी व्यतिरिक्त बजाज फायनान्स (१.४६%), एशियन पेंट्स (०.६३%), आयसीआयसीआय बँक (०.४२%) आणि एचडीएफसी बँक (०.१०%) या शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.
वाचा - आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
निफ्टीची स्थिती समाधानकारकनिफ्टी ५० मधील एकूण ५० कंपन्यांपैकी ३८ कंपन्यांचे शेअर्स आज वधारले, तर १२ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार नसले तरी स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये काही अंशी उत्साह दिसून आला.
Web Summary : Indian stock market showed mixed trends on the first day of 2026. ITC shares fell due to new excise duty, while NTPC and Mahindra shares gained. Sensex closed marginally down, Nifty edged higher amid sector-specific movements.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में 2026 के पहले दिन मिश्रित रुझान दिखा। आईटीसी के शेयर नई उत्पाद शुल्क के कारण गिरे, जबकि एनटीपीसी और महिंद्रा के शेयरों में लाभ हुआ। सेंसेक्स मामूली गिरावट के साथ बंद हुआ, निफ्टी में तेजी रही।