Stock Market Today : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारानेगुंतवणूकदारांना मोठी भेट दिली आहे. सोमवारी झालेल्या प्रचंड पडझडीनंतर, आज बुधवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या विश्वासामुळे बाजाराने आज 'रॉकेट' भरारी घेतली आहे.
बाजाराची दमदार सुरुवात: १८००+ अंकांची झेपसप्ताहाच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सकाळी बाजार उघडताच दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी हिरवा निशाण दाखवले. सेन्सेक्सची स्थिती: ३० शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स सकाळी १,८१४.८८ अंकांच्या (२.५२%) प्रचंड वाढीसह ७३,७६२.४३ च्या पातळीवर उघडला.निफ्टीची भरारी: एनएसई निफ्टी ५० देखील ५६७.६० अंकांनी (२.५४%) वधारून २२,८९९ वर उघडला.सकाळचे सत्र: सकाळी ९:२० वाजेपर्यंत सेन्सेक्स १८४८ अंकांच्या तेजीसह ७३,७९५ वर, तर निफ्टी २२,८९९ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
'हे' शेअर्स ठरले 'टॉप गेनर्स'आजच्या तेजीमध्ये प्रामुख्याने रिटेल आणि फायनान्स क्षेत्रातील शेअर्सनी आघाडी घेतली आहे. बीएसई बास्केटमधून ट्रेंट, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, इंडिगो आणि एल अँड टी हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत.
सोमवारी काय घडले होते?आजच्या तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारची (३० मार्च) मोठी पडझड विसरता येणार नाही. सोमवारी बाजार प्रचंड दबावाखाली होता. सोमवारी सेन्सेक्स १,६३५.६७ अंकांनी कोसळून ७१,९४७ वर बंद झाला होता. बजाज फिन्सर्व्ह, एसबीआय, ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली होती. निफ्टी ऑटो, बँक निफ्टी, आयटी आणि मिडकॅप अशा सर्वच क्षेत्रांत लाल निशाण होते. ३० पैकी २९ शेअर्स सोमवारी तोट्यात बंद झाले होते.
गुंतवणुकीचा कानमंत्रनव्या आर्थिक वर्षाची सुरुवात सकारात्मक झाली असली, तरी गुंतवणूकदारांनी जागतिक घडामोडींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजची तेजी ही प्रामुख्याने 'शॉर्ट कव्हरिंग' आणि नव्या वर्षातील नव्या गुंतवणुकीमुळे असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
वाचा - ईपीएफ खातेदारांनो सावधान! पेन्शन आणि व्याजाबाबतचे 'हे' ५ गैरसमज दूर करा; अन्यथा होईल नुकसान
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market soared on the first day of the new financial year. Sensex jumped 1800 points, Nifty surged, boosted by positive global cues and investor confidence. Retail and finance stocks led gains after Monday's market slump.
Web Summary : नए वित्तीय वर्ष के पहले दिन भारतीय शेयर बाजार में तेजी आई। वैश्विक संकेतों और निवेशकों के विश्वास से सेंसेक्स 1800 अंक ऊपर, निफ्टी में उछाल। सोमवार की गिरावट के बाद खुदरा और वित्त शेयरों में तेजी।