Join us

परकीय गुंतवणूकदारांना अजूनही बाजारावर विश्वास बसेना? ७९२ कोटींच्या शेअर्सची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:48 IST

foreign investors : परदेशी गुंतवणूकदारांनी ७९२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,७२३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. बाजारातील घसरणीचे कारण जागतिक अनिश्चितता आहे.

foreign investors : भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास हळुहळू कमकुवत होत चालला आहे. यामध्ये परकीय गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा वाटा आहे. म्हणूनच ते सातत्याने शेअर्सची विक्री करत आहेत. १३ मार्चला परकीय गुंतवणूकदारांनी ७९२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,७२३ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. परकीय गुंतवणूकदारांची विक्री कधी थांबणार? असा प्रश्न आता सर्वांना सतावू लागला आहे.

परकीय गुंतवणूकदारांची पाठ१३ मार्चच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान, परकीय गुंतवणूकदारांनी ११,६०१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि १२,३९४ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. याउलट देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १०,०३२ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आणि ८,३०८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. या वर्षात आतापर्यंत FII नी १.६४ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, तर DII ने १.७७ लाख कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

इक्विटी मार्केटबद्दल बोलायचे झाले तर देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक १३ मार्च रोजी लाल रंगात बंद झाले. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेने भारत आणि अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीच्या चांगल्या बातम्यांवर दबून गेल्या. ऑटोमोबाईल आणि आयटी समभागांमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली, ज्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्सवर दबाव वाढला. आज, शुक्रवारी होळीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद आहेत.

बाजारात का घसरण होतेयं?भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीमागील मुख्य कारण परकीय गुंतवणूकदारांची विक्री आहे. परकीय गुंतवणूकदारांच्या सततत्या विक्रीमागे अनेक कारणे आहेत. यात प्रामुख्याने जागतिक आणि देशांतर्गत घटक कारणीभूत आहेत. अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीन यांसारख्या देशांवर उच्च शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.  तर भारतासह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केल्याने बाजारात नकारात्मक प्रभाव पडला आहे. दुसरीकडे देशांतर्गत आघाडीच्या कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षाप्रमाने नसल्याने नकारात्मक भावना आणखी वाढली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानेही एफपीआयला गुंतवणूक महाग वाटत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे ते सातत्याने विक्री करत आहे.

परकीय गुंतवणूकदारांचा चीनकडे मोर्चारुपया घसरल्याने परकीय गुंतवणूकदारांचा नफा कमी झाला आहे. त्यातच केंद्रीय अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ केली. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर १२.५ टक्के कर आणि अल्प मुदतीवर २० टक्के कर आहे. इतर अनेक देशांमध्ये दीर्घ आणि अल्पमुदतीच्या गुंतवणुकीवर शून्य किंवा कमी कर आहे. अशात चीनने त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. साहजिकच परकीय गुंतवणूकदार तिकडे आकर्षित झाले नसते तरच नवल. यामुळे चिनी शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारपरकीय गुंतवणूकगुंतवणूक