Share Market Closing : आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेत, कच्चे तेलाचा भडका आणि भू-राजकीय तणावामुळे आज भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाला. सुरुवातीच्या सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, आयटी क्षेत्रातील शेअर्सनी बाजाराला सावरले. यामुळे सोमवारच्या अखेरच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्स ७७.०५ अंकांच्या (०.१० टक्के) किरकोळ वाढीसह ७५,३१५.०४ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६.४५ अंकांच्या (०.०३ टक्के) वाढीसह २३,६४९.९५ वर स्थिरावला. बाजार जरी सावरला असला, तरी ब्रॉडर मार्केटमध्ये मंदीचे सावट होते. दिवसभरात केवळ १,२१६ शेअर्स वधारले, तर तब्बल २,८९१ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.
गुंतवणूकदारांना ₹३ लाख कोटींचा फटका
ब्रॉडर इंडेक्समधील घसरणीमुळे बीएसईमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटल ४६१ लाख कोटी रुपयांवरून घसरून ४५८ लाख कोटी रुपयांवर आले. याचा अर्थ असा की, बाजार सपाट बंद झाला तरी शेअर्समधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना एकाच दिवसात तब्बल ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
आयटीचा आधार; ऑटो, बँकिंगवर दबाव
आजच्या सत्रात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी शेअर्स बाजारासाठी तारणहार ठरले. मात्र, ऑटो, पीएसयू बँक (सरकारी बँका), मीडिया आणि मेटल शेअर्सवर आज विक्रीचा प्रचंड दबाव होता. बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक 'India VIX' ४.५ टक्क्यांनी वाढला, जो बाजारात आगामी काळात येणाऱ्या मोठ्या चढ-उतारांचे संकेत देतो.
टॉप गेनर्स आणि लूझर्स (सेंसेक्स):
तेजी असलेले शेअर्स: टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि भारती एअरटेल.
घसरलेले शेअर्स: टाटा स्टील, पावर ग्रिड आणि एनटीपीसी .
(टीप- हा गुंतवणूकाचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थतज्ञाचा सल्ला घ्या.)
Web Summary : Indian stock market witnessed volatility due to global cues. IT stocks supported recovery, but broader market declined. Investors lost ₹3 lakh crore as BSE's market capitalization fell amidst widespread losses in auto, banking, and metal sectors.
Web Summary : वैश्विक संकेतों से भारतीय शेयर बाजार में अस्थिरता रही। आईटी शेयरों ने सुधार का समर्थन किया, लेकिन व्यापक बाजार में गिरावट आई। ऑटो, बैंकिंग और मेटल क्षेत्रों में व्यापक नुकसान के बीच बीएसई का बाजार पूंजीकरण गिरने से निवेशकों को ₹3 लाख करोड़ का नुकसान हुआ।