Join us

Share Market Closing Bell : अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात घसरण; मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:08 IST

Stock Market Today: २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मात्र, आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे

Stock Market Today: २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मात्र, आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. अर्थसंकल्पापूर्वी ऑटो शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. आजच्या कामकाजाअखेर बीएसई सेन्सेक्स १०२.५७ अंकांनी घसरून ८०,५०२ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी २१.६५ अंकांनी घसरून २४,५०९.२५ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात एनटीपीसी २.५८ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.३४ टक्के, एचडीएफसी बँक २.१५ टक्के, टाटा स्टील १.८७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.८७ टक्के, पॉवर ग्रिड १.७६ टक्के, टाटा मोटर्स १.४२ टक्के, सन फार्मा १.०१ टक्के, एल अँड टी ०.९० टक्के, मारुती सुझुकी ०.८९ टक्के, इन्फोसिस ०.८७ टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर रिलायन्स ३.४६ टक्के, कोटक महिंद्रा बँक ३.३० टक्के, आयटीसी १.७५ टक्के, एसबीआय १.२१ टक्क्यांनी घसरुन बंद झाले.

आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा, कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. ऑईल अँड गॅस, आयटी, ऊर्जा, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक १.२४ टक्क्यांनी वधारून ५६,६०४ अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.९६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्सच्या ३० पैकी १४ शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर १६ शेअर्स घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारअर्थसंकल्प 2024