Join us

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली रिकव्हरी, एअरटेलसह या शेअर्समध्ये उसळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:55 IST

Stock Market Updates : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 759.05 अंकांच्या वाढीसह 79,802.79 अंकांवर आणि NSE निफ्टी 50 देखील 216.95 अंकांच्या वाढीसह 24,131.10 अंकांवर बंद झाला.

Stock Market Updates : काल (गुरुवारी) निराश झालेल्या गुंतवणूकदारांनाशेअर बाजारात आज सुखःद धक्का बसला. शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी वर गेला होता. त्याचवेळी, निफ्टी ७० अंकांच्या वाढीसह २४,००० च्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. बँक निफ्टी १५० हून अधिक अंकांनी वाढून ५२,००० च्या वर व्यवहार करत होता. याआधी, कालच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ११ अंकांनी घसरून ७९,०३२ वर उघडला. निफ्टी १३ अंकांनी वाढून २३,९२७ वर उघडला. आणि बँक निफ्टी ७८ अंकांनी वाढून ५१,९८४ वर उघडला.

पॉवर ग्रिड शेअर्समध्ये मोठी घसरणशुक्रवारी सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित ४ कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. निफ्टी ५० मधील ५० पैकी ४३ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले आणि उर्वरित ७ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या पॉवर ग्रिडचे शेअर्स आज १.३२ टक्क्यांच्या सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय नेस्ले इंडियाचे शेअर्स ०.०७ टक्क्यांनी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स ०.०५ टक्क्यांनी आणि इन्फोसिसचे शेअर्स ०.०२ टक्क्यांनी घसरले.

भारती एअरटेलच्या शेअरमध्ये उसळीआज भारती एअरटेलचा शेअर सर्वाधिक ४.४० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सन फार्माचे समभाग २.९१ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.४५ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.७८ टक्के, अदानी पोर्ट्स १.६६ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज १.५७ टक्के, लार्सन अँड टुब्रो १.५३ टक्के, जेएसडब्लू स्टीलचे शेअर १.२५ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर १.१९ टक्के, टायटन १.१६ टक्के, टाटा मोटर्स १.०७ टक्के, मारुती सुझुकी १.०२ टक्के वाढीसह बंद झाले. गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.

या कंपन्यांचे शेअर्सही वाढलेयाशिवाय आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टाटा स्टील, एचसीएल टेक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, टीसीएस, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि टेक महिंद्रा यांचे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक