Join us

दोन दिवसांच्या वाढीनंतर मार्केटने पुन्हा केलं निराश! घसरणीतही अल्ट्राटेकसह या शेअर्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:47 IST

Share Market : शेअर बाजारातील २ दिवसांच्या वाढीनंतर आज पुन्हा एकदा मार्केट लाल रंगात बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंटसह काही शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली आहे.

Share Market : सध्या शेअर बाजारात सापशिडीचा खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजार कधी वर जातोय तर कधी धापदिशी आपटतोय. सलग २ दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी अस्थिरता होती. बाजार सकाळी वाढीसह हिरव्या रंगात उघडला. पण, बंद होईपर्यंत लाल रंगात गेला होता. आज BSE सेन्सेक्स १०५.७९ अंकांच्या घसरणीसह ८०,००४.०६ अंकांवर तर निफ्टी २७.४० अंकांच्या घसरणीसह २४,१९४.५० अंकांवर बंद झाला. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ८०,४८२.३६ अंकांच्या इंट्राडे उच्च आणि ७९,७९८.६७ अंकांच्या इंट्राडे नीचांकावर पोहोचला होता.

अल्ट्राटेक सिमेंट शेअर्सने खाल्ला भावमंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १४ कंपन्यांचे शेअर वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित १६ कंपन्यांचे शेअर घसरणीसह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २३ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले आणि उर्वरित २७ कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये आज एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक १.७६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक ३.०७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढइन्फोसिसचे शेअर्स १.६८ टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स ०.९१ टक्के, टीसीएसचे शेअर्स ०.७७ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ०.६५ टक्के, टाटा स्टीलचे ०.६३ टक्के, इंडसइंड बँकचे ०.५९ टक्के, टायटनचे ०.५८ टक्के, टेक महिंद्राचे ०.५८ टक्के, टेक महिंद्राचे शेअर्स ०.५८ टक्के, इन्फोसिसचे शेअर्स १.६८ टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स ०.९१ टक्के, टीसीएसचे शेअर्स ०.७७ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ०.६४ टक्के, टाटा स्टीलचे ०.६३ टक्के, इंडसइंड बँकचे ०.५९ टक्के, टायटनचे ०.५८ टक्के, टेक महिंद्राचे ०.५८ टक्के, टेक महिंद्राचे शेअर्स ०.५८ टक्के, नेस्ले इंडियाचे शेअर्स ०.२८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२७ टक्के, आयटीसी ०.०३ टक्के आणि एचडीएफसी बँक ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

या कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंदअदानी पोर्ट्सचे शेअर्स ३.०० टक्के, सन फार्मा २.२१ टक्के, एनटीपीसी १.८० टक्के, टाटा मोटर्स १.५२ टक्के, पॉवरग्रिड १.४७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.३७ टक्के, लार्सन अँड टुब्रो १.३१ टक्के, ॲक्सिस बँकेचे शेअर्स १.०४ टक्के, मारुती सुझुकी ०.८८ टक्के, बजाज फायनान्स ०.८५ टक्के, स्टेट बँक ०.८५ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.७६ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.४२ टक्के, हिंदुस्थान युनिव्हर ०.१६ टक्के आणि भारती एअरटेल ०.०६ टक्क्यांसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक