Join us

शेअर बाजाराच्या घसरणीतून अब्जाधीशही सुटले नाहीत; सर्वाधिक नुकसान कोणाला? टॉप ५ नावं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:38 IST

Stock Market Crash: परकीय गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे २०२५ मध्ये शेअर बाजारातून सुमारे १० अब्ज डॉलर गायब झाले आहेत. या घसरणीमुळे केवळ किरकोळ गुंतवणूकदारांचेच नुकसान झाले नाही तर बाजारातील मोठ्या बुल्सलाही फटका बसला आहे.

Stock Market Crash: ऑक्टोबर २०२४ पासून सुरू भारतीय शेअर बाजारात सुरू झालेली घसरण अजूनही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. या आठवड्यात तर एकही दिवस असा उजाडला नाही, ज्यादिवशी घसरण झाली नसेल. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचा कल आजही कायम राहिला. बीएसई सेन्सेक्स १२ फेब्रुवारी रोजी १२२.५२ अंकांनी घसरून ७६,१७१.०८ वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी २६.२५ अंकानी घसरुन २३,०४५.२५ च्या पातळीवर बंद झाला. गेल्या ४० दिवसात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात किरकोळ गुंतवणूकदारच नाही तर अब्जाधीशही सापडले आहेत.

बाजाराची स्थिती कशी होती?निफ्टीवरील आजच्या ट्रेडिंग सत्रात, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयशर मोटर्स, आयटीसी, हिरो मोटोकॉर्प या समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर एसबीआय लाइफ इन्शरन्स, बजाज फिनवर्स, एचडीएफसी लाइफ, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कन्झुमर या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. सत्रादरम्यान बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरले. तसेच बँक आणि मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. भारतीय रुपया बुधवारी किरकोळ घसरत ८६.८८ प्रति डॉलरवर बंद झाला, तर मंगळवारी तो ८६.८३ प्रति डॉलरवर बंद झाला.

अब्जाधीश गुंतवणूकदारांचा पैसाही बुडालाशेअर बाजारातील घसरणीमुळे मुकुल अग्रवाल यांना ८८४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर आकाश भन्साळी यांचे नाव येते. शेअर बाजारातील घसरणीमुळे आकाश यांना ९३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर नेमिश शाह यांना ४६२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर मधुसूदन केळीचे नाव आहे. बाजारातील घसरणीमुळे त्यांना ५०६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विजय केडिया आणि सुनील सिंघानिया यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना २७८ आणि ५१५ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

निफ्टी५० चे सर्वात मोठे नुकसानजर आपण मागील एका महिन्याच्या डेटाबद्दल बोललो तर निफ्टी ५० च्या ज्या कंपन्यांमध्ये सर्वात जास्त घसरण झाली आहे, त्यामध्ये ट्रेंट लिमिटेड आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात या समभागात २०.४ टक्क्यांची घसरण झाली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या समभागात १४.६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड तिसऱ्या क्रमांकावर असून त्यात १४.१ टक्क्यांची घसरण झाली. यानंतर टाटा मोटर्सचा क्रमांक लागतो. या समभागात १२.३ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकगुंतवणूक