Join us

बाजारात मोठी पडझड; टाटा, ओएनजीसीसह दिग्गज स्टॉक कोसळले; कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:21 IST

share market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजार हलले आहे. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात २-२ टक्क्यांची घसरण झाली.

share market : सोमवारचा दिवस शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी काळा दिवस ठरला. सकाळी बाजार रेड झोनमध्ये उघडला होता. बंद होईपर्यंत काहीतरी दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, बाजार पुन्हा एकदा मोठ्या घसरणीसह बंद झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेचा जगभरातील शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला. यातून भारतही सुटला नाही. तर दुसरीकडे रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरला आहे. शेअर बाजारातील कोणत्या सेक्टरमध्ये आज सर्वाधिक घसरण झाली? कोणत्या स्टॉक्सने सावरलं? याबाबत अधिक जाणून घेऊया.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) बेंचमार्क सेन्सेक्स ५४८.३९ अंकांच्या तीव्र घसरणीसह ७७,३११.८० वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निर्देशांक निफ्टी ५० देखील १७८.३५ अंकांनी घसरला आणि व्यवहाराच्या शेवटी २३,३८१.६० च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीचा कल कायम आहे.

मेटल स्कॉक्समध्ये सर्वाधिक घसरणआजच्या व्यवहारात निफ्टी, ट्रेंट, पॉवर ग्रिड कॉर्प, टाटा स्टील, टायटन कंपनी, ओएनजीसी या दिग्गज कंपन्याच्या शेअर्सला मोठा धक्का बसला. तर कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा ग्राहक उत्पादने यांच्या वाढ झाली. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक २-२ टक्क्यांनी घसरले. तर मेटल, मीडिया, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स, एनर्जी, रियल्टी हे सेक्टरचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.

जगभरातील बाजारांची काय स्थिती?सोमवारी जागतिक शेअर बाजारात संमिश्र कल होता. फ्रान्सचा CAC ४० सुरुवातीच्या व्यापारात ०.२% वाढून ७,९८८.२९ वर पोहोचला, तर जर्मनीचा DAX ०.३% वाढून २१,८१७.७९ वर पोहोचला. ब्रिटनचा FTSE १०० ०.४% वाढून ८,७३८.९८ वर पोहोचला. डाऊ फ्युचर्स ०.२% वाढून ४४,५०७.०० वर गेल्याने यूएस स्टॉक वाढण्याची शक्यता आहे. S&P ५०० फ्युचर्स ०.३% वाढून ६,०६७.५० वर पोहोचले.

आशियामध्ये, जपानचा बेंचमार्क Nikkei २२५ थोडासा बदलला, ०.१% पेक्षा कमी वाढून ३८,८०१.१७ वर आला. चलन व्यापारात, यूएस डॉलर १५१.३९ येन वरून १५२.४१ जपानी येन वर पोहोचला. युरोची किंमत १.०३२८ वरून १.०३२१ वर घसरली. ट्रम्प यांनी चीनी आयातीवर शुल्क लादले असूनही हँग सेंग निर्देशांक १.८% वाढून २१,५२१.९८ वर पोहोचला आणि शांघाय कंपोझिट ०.६% वाढून ३,३२२.१७ वर पोहोचला. चिनी उत्तेजक उपायांची आशा वाढल्याने तंत्रज्ञानाच्या साठ्याने फायदा झाला. चीन अमेरिकेच्या निवडक आयातीवर शुल्क लादून प्रत्युत्तर देत आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकनिर्देशांक