Join us
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी दमदार सुरुवात, मात्र दिवसाखेर किरकोळ वाढ; गुंतवणूकदारांचे ७१ हजार कोटी स्‍वाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:17 IST

Share Market Close : आज दिवसभर शेअर बाजारात चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले.

Share Market Close : आज(२० एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात दिवसभर चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, दिवसाखेर प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. BSE Sensex २६.७६ अंकांनी (०.०३%) वाढून ७८,५२०.३० वर बंद झाला, तर NSE Nifty 50 ११.३० अंकांनी (०.०५%) वाढून २४,३६४.८५ वर स्थिरावला.

या सर्व चढ-उतारादरम्यान, BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ₹७१,००० कोटींनी घटले. म्हणजेच, गुंतवणूकदारांनी ₹७१,००० कोटी गमावले. BSE वरील टॉप ३० समभागांपैकी १८ शेअर्समध्ये घसरण दिसून आली, तर १२ शेअर्स किरकोळ वाढीसह बंद झाले. 

टॉप गेनर्स 

  • ट्रेंट
  • एसबीआय
  • जेएसडब्ल्यू स्टील
  • एशियन पेंट्स
  • ग्रासिम इंडस्ट्रीज

टॉप लूजर्स

  • जिओ फायनान्शियल
  • हिंडाल्को
  • एचडीएफसी लाइफ
  • टाटा मोटर्स (पॅसेंजर व्हेईकल्स)
  • कोटक महिंद्रा बँक
  • मिडकॅप आणि स्मॉलकॅपवर दबाव
  • निफ्टी मिडकॅप इंडेक्स: ०.२% घसरण
  • निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स: ०.४% घसरण
  • सेक्टरनिहाय कामगिरी

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

English
हिंदी सारांश
Web Title : Share Market Closes Marginally Higher; Investors Lose ₹71,000 Crore

Web Summary : Indian stock market saw intraday volatility, closing with slight gains. BSE Sensex rose marginally, while Nifty 50 also saw a small increase. Investor wealth eroded by ₹71,000 crore. Midcap and smallcap indices faced pressure. Trent, SBI were top gainers; Jio Financial led losers.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकस्टॉक मार्केट