Join us
Daily Top 2Weekly Top 5

2 कंपन्या...5 दिवस अन् ₹ 60000 कोटींची कमाई, रिलायन्सला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 20:00 IST

Share Market : सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांनी दमदार कामगिरी केली.

Share Market : मागील आठवडा शेअर बाजारासाठी चढ-उतारांनी भरलेला होता. असे असतानाही सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांनी प्रचंड नफा कमावला. केवळ पाच दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी 60,000 कोटींहून अधिकची कमाई केली. यात HDFC बँक आणि Airtel च्या मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ झाली. तर मुकेश अंबानींच्या रिलायन्सादेखील मोठा फायदा झाला. परंतु कमाईच्या बाबतीत या दोघांपेक्षा खूपच मागे होती.

एचडीएफसी बँकेला सर्वाधिक फायदागेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील सहा टॉप 10 कंपन्यांचे बाजारमूल्य 1,18,151.75 कोटी रुपयांनी वाढले. तर, चार कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. दरम्यान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक 354.23 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांनी वाढला. ज्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी मजबूत कमाई केली, त्यात खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी अग्रस्थानी होती. केवळ पाच दिवसांच्या एचडीएफसीच्या गुंतवणूकदारांनी 32,639.98 कोटी रुपयांचा नफा मिळवला. याशिवाय, बँकेचे मार्केट कॅपदेखील 13,25,090.58 कोटी रुपयांवर पोहोचले.

एअरटेल अन् रिलायन्सलाही फायदागुंतवणूकदारांना नफा मिळवून देणाऱ्या इतर कंपन्यांबद्दल बोलायचे तर, भारती एअरटेलचे मार्केट कॅप 31,003.44 कोटी रुपयांनी वाढून 9,56,205.34 कोटी रुपये झाले. याशिवाय बजाज फायनान्सचे एमकॅप 29,032.08 कोटी रुपयांनी वाढून 5,24,312.82 कोटी रुपये झाले, तर इन्फोसिसचे 21,114.32 कोटी रुपयांनी वाढून 7,90,074.08 कोटी रुपये झाले. याशिवाय, रिलायन्स मार्केट कॅप रु. 2,977.12 कोटींनी वाढून रु. 17,14,348.66 कोटी, ICICI बँक  रु. 1,384.81 कोटींनी वाढून रु. 8,87,632.56 कोटींवर पोहोचले.

SBI, TCS ला तोटा दुसरीकडे, ITC लिमिटेडने गेल्या आठवड्यात सर्वात मोठा धक्का दिला. ITC मार्केट कॅप 39,474.45 कोटी रुपयांनी घसरून 5,39,129.60 कोटी रुपयांवर आला. याशिवाय HUL MCap 33,704.89 कोटी रुपयांनी घसरून 5,55,361.14 कोटी रुपयांवर आले. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI चे मार्केट कॅप 25,926.02 कोटी रुपयांनी घसरून 6,57,789.12 कोटी रुपयांवर आले, तर टाटा समूहाची IT कंपनी TCS चे बाजारमूल्य 16,064.31 कोटी रुपयांनी घसरुन 14,57,854.09 कोटी रुपयांवर आले.

रिलायन्स सर्वात मौल्यवान कंपनीमुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांमध्ये सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून आपला दबदबा कायम ठेवला आहे. यानंतर TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, Infosys, SBI, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC आणि बजाज फायनान्स यांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या बाजारातील तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक