Join us

शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:22 IST

Share Market Today: जागतिक संकेतांमध्ये कमजोरी आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे शेअर बाजारात बुधवारीही घसरण दिसून आली.

Share Market Today: जागतिक संकेतांमध्ये कमजोरी आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे शेअर बाजारात बुधवारीही घसरण दिसून आली. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स १४६.८६ अंकांनी घसरून ८१,९५५.२४ वर व्यवहार करत होता. त्याच वेळी, एनएसईचा निफ्टी देखील ४०.७५ अंकांनी घसरून २५,१२८.७५ वर व्यवहार करत होता. सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरणीसह व्यवहार करत होते.

प्रमुख शेअर्समधील चढ-उतार

निफ्टीवर आजच्या व्यवहारात ट्रेंट, एसबीआय, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी आणि ओएनजीसी यांसारख्या प्रमुख शेअर्सनी वाढ नोंदवली. बाजारातील घसरणीनंतरही हे शेअर्स मजबूत होते. दुसरीकडे, हीरो मोटोकॉर्प, टायटन कंपनी, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाल्यानं निफ्टीवर दबाव वाढला.

आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा

रुपया ७ पैशांनी घसरला

बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवरून ७ पैशांनी घसरून ८८.८० वर आला. टॅरिफ आणि एच-१बी व्हिसासंबंधीच्या मुद्द्यांमुळे परदेशी भांडवलाची काढल्यानं घसरण दिसून आली. पीटीआयच्या वृत्तानुसार, परदेशी चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारतीय वस्तूंवर अमेरिकेनं वाढवलेलं शुल्क आणि एच-१बी व्हिसा शुल्कात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला, ज्यामुळे रुपया आपल्या विक्रमी नीचांकी पातळीजवळ आला आहे. आंतरबँक परदेशी चलन विनिमय बाजारात, रुपया ८८.८० वर उघडला, जो मागील बंद किंमतीपेक्षा ७ पैशांनी कमी आहे. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया डॉलरच्या तुलनेत ८८.७१ पर्यंतही पोहोचला होता.

टॅग्स :शेअर बाजार