Join us

सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी! निफ्टी २५,२०० च्या जवळ, 'या' ७ मोठ्या कारणांमुळे मार्केटमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:31 IST

Share Market Rise: आज, ७ ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मजबूत जागतिक संकेत आणि ऊर्जा समभागांमध्ये खरेदीमुळे बाजारातील भावना सकारात्मक आहेत.

Share Market Rise : भारतीय शेअर बाजारांमध्ये मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या दिवशी तेजी दिसून आली. मजबूत जागतिक संकेत आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांना मिळालेल्या खरेदीमुळे बाजारात सकारात्मक वातावरण होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास, सेन्सेक्स ४४४.३६ अंकांनी उसळी घेत ८२,२३४.४८ च्या स्तरावर व्यवहार करत होता. तर निफ्टी ११८.२० अंकांनी वधारून २५,१९५.८५ च्या पातळीवर पोहोचला होता.

बाजारातील तेजीची ७ प्रमुख कारणे१. ऊर्जा आणि मेटल समभागांना मोठा आधारआज बाजाराला ऑईल ॲन्ड गॅस आणि मेटल क्षेत्रातील समभागांनी मोठी मदत केली. या दोन्ही क्षेत्रांचे निर्देशांक अनुक्रमे ०.८% आणि ०.५% पर्यंत वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट आणि सरकारने एलपीजीच्या नुकसानीची भरपाई करण्याची अपेक्षा यामुळे ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी खरेदी दिसून आली. सीमेन्स एनर्जी इंडिया आणि पेट्रोनेट एलएनजीच्या समभागात सर्वाधिक तेजी होती.

२. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची शक्यताअमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह या महिन्याच्या अखेरीस व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक बाजारात तरलता वाढेल आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. मेहता इक्विटीजचे प्रशांत ताप्से यांच्या मते, नास्डाक आणि एस अँड पी ५०० निर्देशांकांनी गाठलेल्या विक्रमी उच्चांकामुळेही गुंतवणूकदारांचे सेंटिमेंट मजबूत झाले आहे.

३. दुसऱ्या तिमाहीचे मजबूत बिझनेस अपडेट्सबँका आणि फायनान्शियल कंपन्यांकडून सप्टेंबर तिमाहीचे आलेले मजबूत बिझनेस अपडेट्स बाजारात नवा उत्साह घेऊन आले आहेत. उदा. बजाज फायनान्सने सप्टेंबर तिमाहीत १.२२ कोटी नवीन कर्जे वितरीत केली, जी मागील वर्षीपेक्षा २६% जास्त आहेत. यामुळे तिमाहीतील कंपन्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित आहे.

४. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेतआशियाई शेअर बाजारांमध्येही मंगळवारी तेजी दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक वाढीसह बंद झाला, ज्यामुळे जागतिक बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. अमेरिकेचे शेअर बाजारही सोमवारी मजबूत बंद झाले होते.

५. सलग चौथ्या दिवशी 'व्हॅल्यू बायिंग'मागील आठ दिवसांच्या घसरणीनंतर अनेक समभागांचे भाव आकर्षक पातळीवर आले होते. गुंतवणूकदार याला प्रवेशाची योग्य संधी मानून सलग चौथ्या दिवशी खरेदी करत आहेत. या बार्गेन हंटिंगमुळे बाजाराला वेग मिळाला आहे.

६. रुपयामध्ये सुधारणाभारतीय रुपया मंगळवारी सकाळी प्रति डॉलर ८८.७३ च्या पातळीवर मजबूत झाला, जो मागील सत्रात ८८.७८ होता. विदेशी भांडवलाच्या आगमनाच्या अपेक्षांमुळे रुपयाला आधार मिळाला आहे.

वाचा - पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?

७. FII च्या विक्रीत घट, DII ची जोरदार खरेदीबाजार विश्लेषकांच्या मते, अलीकडच्या काही दिवसांत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री कमी झाली आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे डॉ. व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, सोमवारी FII नी केवळ ३१३ कोटी रुपयांची विक्री केली, तर DII नी तब्बल ₹५०३६ कोटींची जोरदार खरेदी केली. म्युच्युअल फंड्समधील एसआयपी मार्फत येणारा देशांतर्गत प्रवाह बाजाराला सतत मजबूत आधार देत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Market Soars for 4th Day: Nifty Nears 25,200 on Bullish Factors

Web Summary : Indian stock markets rallied for the fourth consecutive day, fueled by global cues and energy sector gains. Nifty approached 25,200, boosted by strong business updates, potential US rate cuts, and reduced FII selling alongside robust DII buying.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी