Stock Market : गेल्या काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर, बुधवारी भारतीय शेअर बाजाराने दमदार पुनरागमन केले आहे. प्रामुख्याने आयटी आणि खासगी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजार हिरव्या निशाण्यावर व्यवहार करत आहे. सकाळी १० वाजेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनीगुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला.
निर्देशांकांची सकाळची स्थिती
- सेंसेक्स सकाळी ९:१९ वाजता ४३५ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स १० वाजेपर्यंत ६०७ अंकांच्या तेजीसह ८२,८३३ वर पोहोचला.
- निफ्टीमध्ये १९५ अंकांची वाढ होऊन तो २५,६१८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
- मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांतही प्रत्येकी ०.५% ची वाढ नोंदवण्यात आली, ज्यामुळे बाजारात सर्वसमावेशक तेजीचे वातावरण पाहायला मिळाले.
आयटी शेअर्समध्ये 'फेस्टिव्हल ऑफ शेअर्स'आजच्या तेजीचे खरे सारथी आयटी कंपन्यांचे शेअर्स ठरले आहेत. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये २.५% ची मोठी झेप पाहायला मिळाली. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेक यांसारखे दिग्गज शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, सोलर क्षेत्रातील शेअर्सवर अमेरिकन आयात टॅरिफचा मोठा फटका बसला असून, त्यामध्ये १४% पर्यंतची मोठी घसरण पाहायला मिळाली. डॉ. रेड्डीज, मारुती सुझुकी आणि कोल इंडिया यांसारखे शेअर्सही दबावाखाली होते.
बाजारात तेजी येण्याची ५ प्रमुख कारणे
- आयटी स्टॉक्सची रिकव्हरी: गेल्या काही दिवसांच्या मोठ्या पडझडीनंतर आयटी शेअर्समध्ये खालच्या स्तरावरून जोरदार खरेदी झाली.
- जागतिक संकेत: अमेरिकन टेक शेअर्स आणि आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरणाने भारतीय गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला.
- India VIX मध्ये घट: बाजारातील भीती दर्शवणारा 'व्हिक्स' निर्देशांक ६% पेक्षा जास्त घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये जोखीम घेण्याची तयारी वाढली.
- AI ची भीती कमी: टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भीती कमी झाल्याने सेंटीमेंट सुधारले.
- तांत्रिक सपोर्ट: निफ्टीने आपल्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हल्स राखल्याने तांत्रिकदृष्ट्या खरेदीदारांनी बाजार उचलून धरला.
वाचा - चांदी ६ हजारांनी महागली तर सोन्यातही मोठी वाढ! 'या' कारणामुळे मौल्यवान धातूत पुन्हा तेजी
रुपयाच्या मूल्यातही सुधारणा
शेअर बाजारातील तेजीचा सकारात्मक परिणाम रुपयावरही दिसून आला. कमकुवत डॉलर आणि देशांतर्गत बाजारातील मजबूत सुरुवातीने रुपया ६ पैशांनी मजबूत होऊन ९०.८९ वर पोहोचला. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे रुपयाची ही तेजी काहीशी मर्यादित राहिली.
Web Summary : Indian stock market rebounds, driven by IT and banking shares. Infosys and Tech Mahindra surge. Recovery attributed to global cues, reduced AI fears, and strong technical support despite crude oil impact.
Web Summary : आईटी और बैंकिंग शेयरों के कारण भारतीय शेयर बाजार में सुधार। इंफोसिस और टेक महिंद्रा में तेजी। वैश्विक संकेतों, एआई के डर में कमी और मजबूत तकनीकी समर्थन से रिकवरी, कच्चे तेल का असर।