Sensex-Nifty Closes Green : भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरणात 'रेपो रेट' ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवल्याने शेअर बाजारात शुक्रवारी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. सुरुवातीच्या सत्रात जागतिक संकेतांमुळे बाजार दबावाखाली होता. मात्र, आरबीआयने धोरणात्मक स्थिरता स्पष्ट केल्यावर गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला. दिवसअखेर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी हिरव्या निशाण्यात बंद होत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला.
गुंतवणूकदारांची ३४,१४४ कोटींची कमाईआरबीआयच्या निर्णयामुळे बाजारातील अनिश्चितता संपली आणि त्याचा परिणाम थेट गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर झाला. काल (५ फेब्रुवारी) बीएसईवर सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,६६,७०,६००.०१ कोटी रुपये होते, जे आज वाढून ४,६७,०४,७४४.११ कोटींवर पोहोचले. गुंतवणूकदारांच्या भांडवलात आज एकाच दिवशी ३४,१४४.१० कोटींची भर पडली.
प्रमुख निर्देशांकांची कामगिरी
- सेन्सेक्स : २६६.४७ अंकांच्या (०.३२%) वाढीसह ८३,५८०.४० वर बंद.
- निफ्टी ५० : ५०.९० अंकांच्या (०.२०%) उसळीसह २५,६९३.७० वर स्थिरावला.
- क्षेत्रीय कामगिरी : निफ्टी FMCG इंडेक्स २% वाढीसह आघाडीवर राहिला, तर IT क्षेत्रात १% हून अधिक घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मात्र आजही नफेखोरीचा दबाव दिसून आला.
वाचा - महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष
सेन्सेक्समधील १३ शेअर्स 'ग्रीन झोन'मध्ये
- आजच्या व्यवहारात 'एफएमसीजी'च्या दिग्गज कंपन्यांनी बाजाराला सावरले.
- तेजीतील शेअर्स : आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स.
- घसरणीतील शेअर्स : टीसीएस, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स आणि एशियन पेंट्स.
Web Summary : RBI's stable repo rate boosted market sentiment. Sensex and Nifty closed green, driven by FMCG gains. Investors earned ₹34,144 crore as uncertainty reduced. IT sector faced a decline.
Web Summary : आरबीआई की स्थिर रेपो दर से बाजार में तेजी आई। सेंसेक्स और निफ्टी हरे निशान पर बंद हुए, एफएमसीजी में लाभ हुआ। अनिश्चितता कम होने से निवेशकों ने ₹34,144 करोड़ कमाए। आईटी क्षेत्र में गिरावट आई।