Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्धातील एका बातमीने बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची झेप, फक्त 'या' क्षेत्रात घसरण थांबेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:22 IST

Share Market Today : गुरुवारी, भारतीय शेअर बाजारांमध्ये एक शानदार तेजी दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स ९०० अंकांनी म्हणजेच १.१४ टक्क्यांनी वाढून ८०,०१५ वर बंद झाला.

Share Market : सलग तीन दिवस सुरू असलेल्या घसरणीला आज गुरुवारी पूर्णविराम मिळाला. मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून आलेल्या एका सकारात्मक बातमीने भारतीय शेअर बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. सेन्सेक्स ९०० अंकांच्या उडीसह ८०,००० चा टप्पा पार करून बंद झाला, तर निफ्टीनेही मोठी मजल मारली.

बाजाराची आजची कामगिरी (५ मार्च २०२६)सेन्सेक्स : ९०० अंकांच्या (१.१४%) वाढीसह ८०,०१५ वर बंद.निफ्टी : २८५ अंकांच्या (१.१७%) वाढीसह २४,७६५ वर स्थिरावला.संपत्तीत भर: बीएसईवरील कंपन्यांचे मार्केट कॅप ६.५५ लाख कोटी रुपयांनी वाढून ४५२.९८ लाख कोटींवर पोहोचले.

काय आहे इराणच्या सकारात्मक भूमिकेचा अर्थ?बाजार तेजीत येण्याचे मुख्य कारण म्हणजे इराणच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य. जर अमेरिकेने समाधानकारक प्रस्ताव दिला, तर इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम मागे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बातमीमुळे युद्धाची भीती काही प्रमाणात कमी झाली असून, जागतिक बाजारपेठांमध्ये सुरक्षित खरेदीला सुरुवात झाली आहे.

सेक्टर अपडेट आणि टॉप गेनर्सआयटी क्षेत्राला वगळता सर्वच सेक्टर इंडेक्समध्ये आज तेजी होती. मेटल, पॉवर, डिफेन्स आणि कंज्यूमर ड्युरेबल्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली.

  • टॉप गेनर्स: अदाणी पोर्ट्स (४.५१%), एल अँड टी (३.८८%), एनटीपीसी (३.२४%), रिलायन्स (३.०५%) आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.९८%).
  • टॉप लूजर्स: टेक महिंद्रा (-१.३०%), एचसीएल टेक, एचयूएल आणि आयसीआयसीआय बँक.

वाचा - 'या' भारतीय व्यक्तीकडे तब्बल १६,००० किलोग्रॅम सोने; एका साध्या दुकानातून उभे केले ४५ हजार कोटींचे साम्राज्य!

बाजारपेठेचा कौलबीएसईवर आज एकूण ४,३९७ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,८०१ शेअर्स तेजीसह बंद झाले. केवळ १,४५६ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, आज ६६ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ३८१ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले. 

English
हिंदी सारांश
Web Title : War News Sparks Market Rally; Sensex Soars, IT Sector Lags

Web Summary : Positive news from Iran fueled a market rally. Sensex jumped 900 points, surpassing 80,000. Nifty also surged. Except for the IT sector, all indices showed gains, with metal and power leading the way. Market cap increased significantly.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी