Share Market Rise : सकाळच्या सत्रात विक्रीच्या दबावाखाली दबलेल्या भारतीय शेअर बाजाराने दुपारनंतर मात्र जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्स आणि निफ्टीने सुरुवातीची १ टक्क्यांची घसरण भरून काढत सलग चौथ्या दिवशी तेजीचा कल कायम राखला. सेन्सेक्सने ५५० अंकांची झेप घेत ७४,६०० चा स्तर गाठला, तर निफ्टीने २३,१०० अंकांच्या महत्त्वाच्या टप्प्याला ओलांडले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही अर्ध्या टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
बाजारची आजची स्थितीBSE सेन्सेक्स : ७४,६४६.०० (+५४०.३५ अंक | ०.७३% वाढ)NSE निफ्टी : २३,१३६.६० (+१६८.३५ अंक | ०.७३% वाढ)
आजच्या तेजीची 'ही' ४ प्रमुख कारणे१. खालच्या स्तरावर 'व्हॅल्यू बाइंग'सकाळच्या सत्रात निफ्टी २२,७०० च्या जवळ पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी स्वस्त झालेल्या शेअर्समध्ये खरेदी सुरू केली. विशेषतः आयटी, मेटल आणि रिअल्टी क्षेत्रात मोठी मागणी दिसली. जेपी मॉर्गनच्या सकारात्मक अहवालामुळे हिंदाल्को आणि वेदांता यांसारख्या मेटल शेअर्समध्ये तेजीचे वातावरण होते.
२. आयटी शेअर्सची 'चौकार' कामगिरीमार्च तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा सरस लागतील या आशेने आयटी शेअर्समध्ये सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. निफ्टी आयटी इंडेक्समध्ये २.५ टक्क्यांची वाढ झाली. एमफॅसिस, विप्रो, एचसीएल टेक आणि एलटीआय माइंडट्री या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत उसळी दिसून आली.
३. रुपयाचे बळ आणि जागतिक स्थितीबँकांनी आपल्या आर्बिट्राज पोझिशन्स कमी केल्यामुळे भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६ पैशांनी मजबूत होऊन ९३.०० च्या पातळीवर स्थिरावला. दरम्यान, अमेरिका-इराणमधील तणावामुळे आणि इराणला दिलेल्या २४ तासांच्या अल्टिमेटममुळे व्यापारी कच्च्या तेलाच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
४. आरबीआय धोरणाकडे लक्षउद्या, ८ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर होणार आहेत. नवीन वित्त वर्षातील ही पहिलीच बैठक असून, रेपो रेटमध्ये बदल होणार नाही असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, महागाई आणि जीडीपी वाढीबाबत आरबीआय काय भाष्य करते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
वाचा - ३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
चार्ट्स काय सांगतात?'जियोजित इन्व्हेस्टमेंट्स'चे आनंद जेम्स यांच्या मते, निफ्टीचा कल सध्या सकारात्मक असून २२,७९० च्या आसपास घसरण झाल्यास खरेदीची संधी आहे. जोपर्यंत निफ्टी २२,६४० च्या वर टिकून आहे, तोपर्यंत बाजारात तेजीचा कल राहील आणि पुढील लक्ष २४,४०० असू शकते.
Web Summary : Indian stock market rebounded after an early dip, with Sensex gaining 550 points and Nifty surpassing 23,100. Value buying, strong IT performance, rupee strength, and anticipation of RBI's policy fueled the rally. Experts predict continued bullish trend if Nifty holds above 22,640.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में सुबह की गिरावट के बाद सुधार हुआ, सेंसेक्स 550 अंक ऊपर और निफ्टी 23,100 के पार। वैल्यू बाइंग, आईटी शेयरों का प्रदर्शन, रुपये की मजबूती और आरबीआई नीति की उम्मीदों ने तेजी को बढ़ावा दिया। जानकारों का मानना है कि निफ्टी 22,640 से ऊपर रहने पर तेजी जारी रहेगी।