Join us

सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; बजाज ऑटोमध्ये तेजी, अपोलो हॉस्पिटल घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 09:58 IST

बुधवारी शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 198 अंकांनी घसरून 73492 अंकांच्या पातळीवर उघडला.

Stock Market Open: बुधवारी शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 198 अंकांनी घसरून 73492 अंकांच्या पातळीवर उघडला. तर निफ्टी 52 अंकांनी घसरून 22304 अंकांच्या पातळीवर उघडला. त्यानंतर त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी, निफ्टी बँक यासह सर्व निर्देशांकांमध्ये घसरण दिसून येत होती. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, कोटक बँक, एसबीआय लाइफ, कोल इंडिया लिमिटेड, अल्ट्राटेक सिमेंट आणि यूपीएलचे शेअर्स वधारले, तर अपोलो हॉस्पिटल, टीसीएस टेक, महिंद्रा, ब्रिटानिया, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प आणि बीपीसीएल यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीच्या गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी 9 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर अदानी पॉवर लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, देवयानी, फेडरल बँक आणि मुथूट फायनान्सचे शेअर्स तेजीत होते, तर एचडीएफसी बँकेसह इन्फोसिस, एसबीआय कार्ड आणि बजाज फायनान्स यांसारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

सलग चार दिवसांच्या वाढीनंतर प्रॉफिट बुकिंगमुळे मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. शेअर बाजारातील गुंतवणूकदार अमेरिकन सेंट्रल बँक, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांवरील घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :शेअर बाजार