Join us

Sensex-निफ्टीची तेजीनं सुरूवात; आयटी शेअर्समध्ये घसरण, कॅनरा बँक शेअर स्प्लिट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 09:45 IST

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली. तर निफ्टी आयटी थोड्या घसरणीसह ट्रेड करत होता.

Stock Market Open today: शेअर बाजाराचं कामकाज बुधवारी तेजीसह सुरू झालं. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 348 अंकांच्या उसळीसह 72503 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 109 अंकांच्या वाढीसह 22039 अंकांच्या पातळीवर उघडला. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ दिसून आली. तर निफ्टी आयटी थोड्या घसरणीसह ट्रेड करत होता.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात ब्रिटानिया, ॲक्सिस बँक, एचडीएफसी लाईफ, एसबीआय, कोल इंडिया, एशियन पेंट्स आणि टायटन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर पॉवर ग्रिड, इन्फोसिस, यूपीएल, विप्रो , बीपीसीएल, एचसीएल टेक आणि टीसीएसचे शेअर्समध्ये घसरणीसह व्यवहार करत होते.

बुधवारी प्री ओपनिंग मार्केटमध्ये वाढ नोंदवली गेली. बीएसई सेन्सेक्स 362 अंकांच्या वाढीसह 72,548 अंकांच्या पातळीवर काम करत होता, तर निफ्टी 115 अंकांच्या वाढीसह 22045 अंकांच्या पातळीवर काम करत होता.

कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणारशेअर बाजाराचं कामकाज बुधवारी सकारात्मक पद्धतीनं सुरू होऊ शकतं, असे संकेत गिफ्ट निफ्टीकडून मिळाले होते. कॅनरा बँकेच्या संचालक मंडळानं 26 फेब्रुवारी रोजी रेकॉर्ड डेटनुसार स्टॉक स्प्लिटची माहिती दिली आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार