Share Market Updates : जीएसटी परिषदेची बैठक ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधी, मंगळवारी बेंचमार्क इक्विटी इंडेक्समध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स १५५ अंकांनी वाढून ८०,५२० वर पोहोचला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० देखील २८ अंकांनी वाढून २४,६५३ वर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये समाविष्ट शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज सर्वाधिक फायद्यात राहिली. १.४ टक्क्यांच्या वाढीसह त्यांच्या शेअरची किंमत १,३७२ रुपयांवर पोहोचली.
शेअर बाजारावर या गोष्टींचा परिणाम दिसेलजीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत जीएसटी सुधारणांबाबत सरकारचे प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. याच अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज शांघाय सहकार्य संघटनेतील पंतप्रधान मोदी, जिनपिंग आणि पुतिन यांच्या भेटीचाही परिणाम दिसून आला. याशिवाय, सुधारित फ्रेमवर्कनुसार एनएसई करारांच्या पहिल्या साप्ताहिक एक्सपायरीचाही गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम होईल. दरम्यान, सेन्सेक्स पर्यायांची समाप्तीची तारीख गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
टॉप गेनर्स आणि लूजर्सनिफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.३१ टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये ०.१० टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली गेली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये (सेक्टोरल इंडेक्स) निफ्टी मीडियामध्ये सर्वाधिक ०.८२% ची, तर निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ०.३४% आणि निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.२०% ची वाढ झाली.
बाकी सर्व निर्देशांक लाल निशाणात व्यवहार करत होते. निफ्टी आयटीमध्ये ०.४२% पर्यंतची घसरण झाली. निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा कमावणाऱ्या शेअर्समध्ये एटरनल आणि बजाज फायनान्स यांचा समावेश होता, ज्यात अनुक्रमे १.१% आणि ०.७% ची वाढ झाली. दरम्यान, सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, डॉ. रेड्डीज लॅब्स, हिंडाल्को, मारुती सुझुकी आणि ॲक्सिस बँक यांचा समावेश होता.
वाचा - 'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
जागतिक बाजाराची स्थितीजागतिक स्तरावर, युरोझोनच्या सीपीआय आकडेवारीसह अमेरिकेच्या आयएसएम मॅन्युफॅक्चरिंग आणि एस अँड पी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय आकडेवारीवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित राहील. आशियाई बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास, एससीओच्या सकारात्मक परिणामांच्या अंदाजामुळे आशियाई बाजारामध्ये वाढ नोंदवली गेली. जपानच्या निक्केई २२५ मध्ये ०.३१%, दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये ०.४५% आणि चीनच्या शांघाय कंपोजिटमध्ये ०.०४% वाढ झाली. मात्र, ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स २०० हा ०.४१% पर्यंत घसरला.