Sensex-Nifty Closes Red: तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. BSE Sensex आणि Nifty 50 दोन्ही निर्देशांक रेड झोनमध्ये बंद झाले. आजचे बंद दर सेन्सेक्स ८५२.४९ अंकांनी (१.०९%) घसरून ७७,६६४.०० वर आला, तर निफ्टी २०५.०५ अंकांनी (०.८४%) घसरून २४,१७३.०५ वर बंद झाला. आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती सुमारे ₹३ लाख कोटींनी कमी झाली आहे.
घसरणीमागील प्रमुख कारणे
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाबाबत अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत...या सर्व कारणांमुळे देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव वाढला.
सेक्टरनिहाय स्थिती
आजच्या व्यवहारात ऑटो, PSU बँक आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रात २% पेक्षा जास्त घसरण झाली, तर IT आणि प्रायव्हेट बँकिंग निर्देशांकात १% पेक्षा अधिक घट झाली. दुसरीकडे, फार्मा क्षेत्रात २% पेक्षा जास्त वाढ झाली, मात्र ती बाजार सावरण्यास अपुरी ठरली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव होता. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : After three days of gains, the stock market fell. Sensex dropped 852 points, Nifty closed at 24,173.05, resulting in investor losses of ₹3 lakh crore. Global tensions and rising oil prices contributed to the decline. Experts advise caution and a long-term investment strategy.
Web Summary : तीन दिनों की तेजी के बाद शेयर बाजार में गिरावट आई। सेंसेक्स 852 अंक गिरा, निफ्टी 24,173.05 पर बंद हुआ, जिससे निवेशकों को ₹3 लाख करोड़ का नुकसान हुआ। वैश्विक तनाव और बढ़ते तेल की कीमतों ने गिरावट में योगदान दिया। विशेषज्ञों ने सावधानी और दीर्घकालिक निवेश रणनीति की सलाह दी है।