Join us

आठवड्याची सुरुवात तेजीने! सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद; मारुती सुझुकी ३% हून अधिक घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:26 IST

Share Market : आजच्या व्यवहारादरम्यान, सेन्सेक्सने दिवसाच्या आत ८४,१२७.०० अंकांचा उच्चांक गाठला, तर निफ्टीनेही एका वेळी दिवसाच्या आत २५,८०३.१० अंकांचा उच्चांक गाठला.

Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात संमिश्र राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी इंडेक्स किरकोळ वाढीसह बंद झाले. मात्र, दिवसाच्या अखेरीस अचानक झालेल्या नफावसुलीमुळे (बाजाराची सुरुवातीची मोठी वाढ मर्यादित झाली. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ८४,१२७.०० अंकांचा, तर निफ्टीने २५,८०३.१० अंकांचा इंट्राडे उच्चांक गाठला होता. मात्र, बाजार बंद होण्यापूर्वी अनेक शेअर्समध्ये अचानक विक्री सुरू झाल्यामुळे ही सुरुवातीची तेजी अखेरीस कमी झाली.

चढ-उताराची स्थितीसेन्सेक्समधील ३० पैकी १५ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह (हिरव्या रंगात), तर उर्वरित १५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह (लाल रंगात) बंद झाले. निफ्टी ५० मधील ५० पैकी ३२ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १८ कंपन्यांचे शेअर्स नुकसानीसह बंद झाले.

सर्वाधिक वाढलेले आणि घसरलेले शेअर्सआज सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक १.७०% वाढीसह बंद झाले. याउलट, मारुती सुझुकीचे शेअर्स सर्वाधिक ३.३७% घसरणीसह बंद झाले.

तेजीसह बंद झालेले शेअर्ससोमवारी सेन्सेक्समधील टाटा मोटर्ससह अनेक कंपन्यांनी चांगली कामगिरी केली.

  • टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल्स : १.६९%
  • एटरनल: १.४८%
  • भारतीय स्टेट बँक : १.४१%
  • भारती एअरटेल : ०.९३%
  • सन फार्मा : ०.७९%
  • कोटक महिंद्रा बँक : ०.६३%
  • एचडीएफसी बँक : ०.४९%
  • इन्फोसिस : ०.१९%

घसरणीसह बंद झालेले शेअर्स

  • मारुती सुझुकी : (-) ३.३७%
  • आयटीसी : (-) १.५०%
  • टीसीएस : (-) १.३६%
  • एल अँड टी : (-) १.२७%
  • बीईएल : (-) ०.९२%
  • टायटन : (-) ०.५१%
  • रिलायन्स इंडस्ट्रीज : (-) ०.१४%

वाचा - टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

English
हिंदी सारांश
Web Title : Sensex-Nifty close with slight gains; Maruti Suzuki down over 3%.

Web Summary : Indian stock market witnessed a mixed start. Sensex and Nifty closed with marginal gains, trimmed by profit booking. Mahindra & Mahindra gained, while Maruti Suzuki declined significantly. Investors should consult experts before investing.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी