Share Market Today : भारतीय शेअर बाजार बुधवार, ३ डिसेंबर रोजी सलग चौथ्या दिवशी किरकोळ घसरणीसह लाल निशानमध्ये बंद झाले. रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री सुरू असल्यामुळे बाजाराचे सेंटिमेंट कमकुवत झाले.
गुंतवणूकदारांचे मोठे नुकसानआजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४७२.४६ लाख कोटींवरून घटून ४६९.६६ लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.७९ लाख कोटी रुपयांची घट झाली.
ब्रोडर मार्केटमध्ये मोठी घसरणआज मुख्य निर्देशांकांपेक्षा ब्रॉडर मार्केटमध्ये जास्त घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.९५% नी तुटला, तर स्मॉलकॅप इंडेक्स ०.२२% ने घसरला. सर्वाधिक घसरण बँकिंग (निफ्टी PSU बँक ३% खाली), फायनान्शियल शेअर्स, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑटो शेअर्समध्ये पाहायला मिळाली. मात्र, आयटी कंपन्या आणि खासगी बँकिंग शेअर्समध्ये तेजी असल्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.
सेन्सेक्समधील टॉप गेनर्स
| टॉप गेनर्स | वाढ |
| टीसीएस | १.४१% |
| ICICI बँक | १.३७% |
| इन्फोसिस | १.३०% |
| एचडीएफसी बँक | १.१९% |
| ॲक्सिस बँक | ०.९१% |
टॉप लूजर्स
| टॉप लूजर्स | घट |
| भारत इलेक्ट्रॉनिक्स | २.१३% |
| टायटन | १.८६% |
| महिंद्रा अँड महिंद्रा | १.७८% |
| एनटीपीसी | १.७२% |
| स्टेट बँक ऑफ इंडिया | १.६९% |
४,३१६ शेअर्समध्ये झालेल्या आजच्या व्यवहारात, २,५५४ शेअर्समध्ये घसरण झाली, तर २,६८२ शेअर्स तेजीसह बंद झाले. तसेच, ८५ शेअर्सनी आज आपला ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर २८९ शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर पोहोचले.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market closed lower for the fourth consecutive day. Investors lost ₹2.79 lakh crore. Broader markets saw bigger declines, especially in banking and auto sectors. IT and private banking offered some support.
Web Summary : भारतीय शेयर बाजार लगातार चौथे दिन गिरावट के साथ बंद हुआ। निवेशकों को ₹2.79 लाख करोड़ का नुकसान हुआ। बैंकिंग और ऑटो सेक्टर में भारी गिरावट देखी गई। आईटी और निजी बैंकिंग ने कुछ सहारा दिया।