Share Market : सोमवारचा दिवस देशांतर्गत शेअर बाजारासाठी किंचित फायदेशीर ठरला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार किरकोळ वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ७६.५४ अंकांच्या (०.०९%) वाढीसह ८०,७८७.३० अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही ३२.१५ अंकांच्या (०.१३%) तेजीसह २४,७७३.१५ अंकांवर बंद झाला.
आज दिवसभरात सेन्सेक्सने ८१,१७१.३८ अंकांपर्यंत इंट्राडे उच्चांक गाठला होता, तर निफ्टी ५० ने २४,८८५.५० अंकांच्या इंट्राडे उच्चांकाला स्पर्श केला. केंद्र सरकारने जीएसटी दर स्लॅबमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने आज ऑटोमोबाइल शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. तर दुसरीकडे, आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली.
ऑटो स्टॉक्समध्ये जोरदार तेजीसोमवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १५ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित १५ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० मधील ५० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर २४ कंपन्यांचे शेअर्स तोट्यात बंद झाले.
आज सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक ४.१८ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा ४.१७ टक्के, मारुती सुझुकी २.३२ टक्के, अदानी पोर्ट्स २.२० टक्के, बजाज फायनान्स ०.८९ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.६६ टक्के आणि टाटा स्टीलचे शेअर्स ०.६३ टक्क्यांनी वाढले.
वाचा - हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरलेदुसरीकडे, ट्रेंटच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ३.९० टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय, एशियन पेंट्सचे शेअर्स १.९७ टक्के, एचसीएल टेक १.२१ टक्के, टेक महिंद्रा ०.१३ टक्के, टीसीएस ०.८३ टक्के, सनफार्मा ०.८२ टक्के आणि इन्फोसिस ०.५८ टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.