Join us

दोन दिवसांच्या तेजीनंतर Sensex मध्ये घसरण, तरी गुंतवणूकदारांनी कमावले १ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:20 IST

आज चढ-उतार दरम्यान, शेवटच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान शेअर बाजार ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये आला.

गेल्या दोन व्यवहार दिवसांत शेअर बाजारात दीड टक्क्यांची रिकव्हरी दिसून आली. परंतु आज पुन्हा चढ-उतार दरम्यान, शेवटच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान तो ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये आला. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंट्रा-डेमध्ये जवळपास अर्ध्या टक्क्यांनी वाढ झाली होती, परंतु दिवसाच्या अखेरिस बाजार घसरणीसह बंद झाला. मात्र, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक हजार कोटींची वाढ झाली.आज BSE सेन्सेक्स 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 63874.93 वर बंद झाला आणि निफ्टी 50 देखील 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 19079.60 वर बंद झाला. निफ्टी बँक आज 0.45 टक्क्यांनी घसरला. तर सेन्सेक्समधील 30 पैकी 16 शेअर्स आणि निफ्टी 50 चे 26 शेअर्स वाढीसह बंद झाले.गुंतवणूकदारांनी कमावले 1 हजार कोटी30 ऑक्टोबर 2023 रोजी, BSE वर लिस्टेड सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 311.52 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 31 ऑक्टोबर 2023 रोजी ते वाढून 311.55 लाख कोटी रुपये झाले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक हजार कोटींची वाढ झाली. या शेअर्समध्ये तेजीसेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्टेड आहेत, त्यापैकी 16 आज ग्रीन झोनमध्ये बंद झाले. टायटन, कोटक बँक आणि एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे, आज केवळ M&M, सन फार्मा आणि भारती एअरटेलचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार