Stock Market : गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात दिसलेली सुधारणा शुक्रवारी एकाच झटक्यात पुसली गेली. सकाळच्या सत्रात सामान्य वाटणारा बाजार जसजसा पुढे सरकला, तसतसा विक्रीचा प्रचंड दबाव वाढला आणि अखेर बाजार 'लाल' निशाण दाखवत बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झालेल्या या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बाजार आज कुठे स्थिरावला?सेन्सेक्स : १६९० अंकांच्या प्रचंड घसरणीसह ७३,५८३ वर बंद झाला.निफ्टी : ४८७ अंकांनी कोलमडून २२,८२० वर आला. निफ्टीने २२,८५० ची महत्त्वाची पातळी तोडणे हा तांत्रिकदृष्ट्या मोठा धोक्याचा संकेत मानला जात आहे.
बँकिंग आणि मिडकॅपला मोठा तडाखा
- निफ्टी बँक : १४३४ अंकांनी कोसळून ५२,२७५ वर बंद झाला.
- मिडकॅप इंडेक्स : १२३३ अंकांनी घसरून ५४,०९८ वर आला. याचा अर्थ केवळ मोठ्या कंपन्यांचे शेअर्सच नव्हे, तर मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्येही मोठी विक्री झाली.
- पीएसयू बँक इंडेक्स : सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक कमजोरी पाहायला मिळाली.
आजचे 'टॉप लूझर्स' (सर्वाधिक घसरलेले शेअर्स)टाटा मोटर्स : जेएलआर प्लांटमधील उत्पादन थांबण्याच्या वृत्तामुळे हा शेअर ५% कोसळला.इतर दिग्गज : रिलायन्स, बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि इंटरग्लोब एव्हिएशन यांसारख्या मोठ्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.मिडकॅप्स : पेटीएम, हुडको, भारती हेक्साकॉम आणि युपीएल या शेअर्सवरही विक्रीचा दबाव होता.
घसरणीतही 'या' शेअर्सचा आधारएलआयसी हाऊसिंग फायनान्स : एचएसबीसीने 'बाय' रेटिंग दिल्याने या शेअरमध्ये २% तेजी राहिली.ओएनजीसी : कच्च्या तेलाचे दर ११० डॉलरवर गेल्याने ओएनजीसीचा शेअर ४% पेक्षा जास्त वधारला.
रुपयाचा ऐतिहासिक निचांकरुपयाची पडझड : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९४.८४ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आणि ९४.८१ वर बंद झाला.India VIX : बाजारातील भीती दर्शवणारा 'इंडिया विक्स' निर्देशांक ९% नी उसळला, जो नजीकच्या काळात अधिक अस्थिरतेचा संकेत देत आहे.अॅडव्हान्स-डिक्लाईन रेश्यो : बाजारातील स्थिती इतकी बिकट होती की, एनएसईमध्ये वाढणाऱ्या एका शेअरमागे ७ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली (१:७ रेश्यो).वाचा - रशियाने उघडली सोन्याची तिजोरी! २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष 'गोल्ड बार'ची विक्री; किंमत घसरणार का?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market faced a huge sell-off, with the Nifty falling below 23,000. Banking and mid-cap stocks were hit hardest. The rupee hit a record low. Investors are facing high volatility and fear.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में भारी गिरावट आई, निफ्टी 23,000 के नीचे। बैंकिंग और मिड-कैप शेयरों को सबसे ज्यादा नुकसान हुआ। रुपया रिकॉर्ड निचले स्तर पर। निवेशकों को भारी अस्थिरता और डर का सामना करना पड़ रहा है।