Join us

शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 10:03 IST

Share Market Opening : शेअर बाजारात सोमवारी वरच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले असले तरी ही तेजी फार काळ टिकली नाही आणि निफ्टी ७२ अंकांनी उघडूनही पहिल्या ५ मिनिटांतच निगेटिव्ह झाला.

Share Market Opening : शेअर बाजारात सोमवारी वरच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले असले तरी ही तेजी फार काळ टिकली नाही आणि निफ्टी ७२ अंकांनी उघडूनही पहिल्या ५ मिनिटांतच निगेटिव्ह झाला. बाजार सध्या सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला आहे. वाढ होताच वरच्या पातळीवरून विक्रीचा दबाव वाढताना दिसत आहे.

निफ्टीतील व्यवहार ७२ अंकांच्या वाढीसह २३६०५ च्या स्तरावर, तर सेन्सेक्स २८२ अंकांच्या वाढीसह ७७८६३ च्या पातळीवर उघडला. मात्र अवघ्या काही मिनिटांतच यात घसरण दिसून आली आणि निफ्टी २३५०० च्या खाली व्यवहार करू लागला. निफ्टीसाठी २३,५०० ची पातळी अत्यंत महत्त्वाची आहे. बाजार या पातळीवरून अनेकवेळा सावरला आहे, परंतु वारंवार सपोर्ट लेव्हल हिट झाल्यामुळे ही पातळीही कमकुवत झाली आहे. 

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

कामकाजादरम्यान सेन्सेक्स ३९० अंकांनी घसरून ७७१९३ अंकांवर आला. तर निफ्टी १२८ अंकांच्या घसरणीसह २३,५०४ वर आला. सुरुवातीच्या व्यवहारात हिरो मोटोकॉर्प, हिंडाल्को, एचडीएफसी बँक, कोल इंडिया आणि बजाज फायनान्स या शेअर्समध्ये निफ्टी ५० पॅकमधून खरेदी दिसून येत आहे. 

तर निफ्टी ५० च्या टॉप लूजर्समध्ये मध्ये डॉक्टर रेड्डीज, इन्फोसिस, विप्रो, अपोलो हॉस्पिटल्स आणि टेक महिंद्रा सारख्या शेअर्सचा समावेश आहे. मेटल आणि रियल्टी इंडिसेसमध्ये तेजी दिसून येत आहे. तर ऑटो आणि आयटी क्षेत्रावर दबाव आहे.

टॅग्स :शेअर बाजार