Join us

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सेन्सेक्समध्ये ५९७ अंकांची उसळी, Adani, SBI सह 'या' शेअर्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:05 IST

Stock Market : शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार आजही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात विक्री केली. मात्र, तरीही शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.

Stock Market :शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. हिरव्या रंगात उघडल्यानंतर दिवस जसजसा पुढे सरकत गेला तसतशी बाजाराची ताकद वाढतच गेली. बाजार बंद होतना बीएसई सेन्सेक्स ५९७.६७ अंकांनी उसळी घेत ८०,८४५.७५ वर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी ५० ने देखील १८१.१० अंकांची वाढ नोंदवली. निफ्टी २४,४५७.१५ अंकांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स, एसबीआय, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, रिलायन्स, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक या स्टॉक्सने शेअर बाजाराला वर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वात जास्त वाढ अदानी पोर्ट्समध्ये झाली.

जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंड जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंड स्थानिक बाजारातही पाहायला मिळाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात जोरदार सुरुवात केली. आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरिया, जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग आणि चीनचा शांघाय कंपोझिट यांचा समावेश होता. सोमवारी अमेरिकन बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड ०.१३ टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल ७१.९२ डॉलर वर राहिला. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) सोमवारी विक्री करणारे होते. त्यांनी निव्वळ २३८.२८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) ३,५८८.६६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

कोणत्या सेक्टरमध्ये वाढआज निफ्टीवरील PSU बँक निर्देशांक सुमारे ३ टक्क्यांनी वाढला आहे. मीडिया, मेटल, फायनान्शियल शेअर्स, कंझ्युमर ड्युरेबल, ऑइल आणि गॅस निर्देशांकही चांगल्या वाढीसह बंद झाले. निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, अदानी एंटरप्रायझेस, ॲक्सिस बँक, एसबीआयच्या समभागांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. तर, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एचडीएफसी लाईफ, सन फार्मामध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.

दोन महिन्यांच्या विक्री आणि घसरणीनंतर भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा किरकोळ वाढीसह व्यवहार करत आहेत. वास्तविक, बाजार अद्याप पूर्णपणे तेजीच्या क्षेत्रात आलेले नाहीत. आज बाजाराने जोरदार सुरुवात केली होती. सेन्सेक्स १२५ अंकांच्या वाढीसह ८०,३६२ च्या आसपास दिसला. निफ्टी ६० अंकांच्या वाढीसह २४,३०० च्या वर दिसून आला. बँक निफ्टीनेही ५२,४०० च्या जवळ २८० अंकांची वाढ दर्शवली. कालच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स २८१ अंकांनी वाढून ८०,५२९ वर उघडला. निफ्टी ८१ अंकांनी वाढून २४,३६७ वर उघडला. तर बँक निफ्टी २४८ अंकांच्या वाढीसह ५२,३५७ वर उघडला. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक