Join us

बासमती तांदळाच्या 'या' शेअरमध्ये सातत्यानं अपर सर्किट, ₹१० चा आहे शेअर; Mcap ₹१००० कोटींपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:23 IST

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं आणि शुक्रवारची किरकोळ घसरण वगळता चारही दिवशी बाजारात चांगली खरेदी दिसून आली. दरम्यान एका छोट्य़ा शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.

Sarveshwar Food Share Price : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं आणि शुक्रवारची किरकोळ घसरण वगळता चारही दिवशी बाजारात चांगली खरेदी दिसून आली. निफ्टीनं २४२६३ च्या नीचांकी पातळीवरून उसळी घेतली आणि २४८०० च्या पातळीच्या वर व्यवहार केला. आठवडाभर खरेदीदारांचा दबदबा होता. या आठवड्यातील तेजीमुळे ग्राहकांचा बाजारावरील विश्वास आता वाढत असल्याचं दिसून येत आहे.

निफ्टी २४६६८ च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, काही पेनी शेअर्समध्येही तेजी दिसून आली. बासमती तांदूळ उत्पादक सर्वेश्वर फूड्सच्या शेअरचा (Sarveshwar Food Share Price) भाव शुक्रवारी ५ टक्क्यांनी वधारला आणि अपर सर्किट रेंजमध्ये आल्यानंतर तो १०.३० रुपयांवर बंद झाला.

मार्केट कॅप १ हजार कोटींपार

सर्वेश्वर फूड्स लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये असून शुक्रवारच्या तेजीनंतर या शेअरचे मार्केट कॅप एक हजार कोटी रुपयांच्या पुढे गेलं. ही कंपनी बासमती तांदळाचा व्यवसाय करते. ही कंपनी एसएफएल सर्वेश्वर ग्रुपचा भाग आहे. देशांतर्गत आणि निर्यातीसाठी ब्रँडेड आणि अनब्रँडेड बासमती, तसं बिगर बासमती तांदळावर प्रोसेस आणि मार्केटिंग करण्याचा व्यवसाय ही कंपनी करते. ही कंपनी जम्मू-काश्मीरमध्ये आहे.नुकतीच मिळाली मोठी ऑफर

सर्वेश्वर फूड्स ही एफएमसीजी कंपनी आहे, ज्याच्या उपकंपनीला नोव्हेंबरच्या अखेरीस ऑर्डर मिळाली होती. सर्वेश्वर फूड्सनं एक्स्चेंज फायलिंगद्वारे दिलेल्या माहितीनुसार, सिंगापूरच्या ग्रीन पॉईंट प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीला सुमारे ४४५ मिलियन रुपये किंमतीच्या १२,००० मेट्रिक टन प्रीमियम इंडियन लाँग ग्रेन पारबोइल्ड तांदूळ पुरविण्यासाठी मोठी ऑर्डर मिळाली आहे.

मल्टीबॅगर स्टॉक

हा एक मल्टीबॅगर शेअर आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मोठा परतावा दिलाय. गेल्या वर्षभरात या शेअरनं गुंतवणूकदारांना १२५ टक्के परतावा दिला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १५.५५ रुपये तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४.५० रुपये आहे. तांदूळ प्रक्रिया व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यानं त्याच्या शेअर्सच्या किमती वाढत आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक