Join us

डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:33 IST

Rupee vs Dollar : संपूर्ण आशियामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाने सर्वाधिक ताकद दाखवली आहे. परिस्थिती अशी आहे की चालू वर्षात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत शिखरावर पोहोचला आहे.

Rupee vs Dollar : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल पाहायला मिळाले आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने तर जगभरातील शेअर बाजारांना धक्के बसले. भारतही याला अपवाद राहिला नाही. पण, देशाने आता चांगली कामगिरी करत रिकव्हरी केली आहे. रुपयांच उदाहरण द्यायचं झालं तर या आर्थिक वर्षातील जानेवारी महिन्यात रुपया त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. तिथून, रुपया केवळ सुधारला नाही तर चालू वर्षात सुमारे १ टक्क्याने वाढीसह त्याच्या शिखरावर पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, रुपयाने संपूर्ण आशियामध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. डॉलरच्या तुलनेत सर्वात मजबूत चलन म्हणून रुपयाचा दबदबा पाहायला मिळत आहे.

रुपया मजबूत स्थितीतसोमवारी वाढीसह बंद झाल्यानंतर मंगळवारी रुपया घसरणीसह उघडला. पण, काही वेळातच रुपयाने संपूर्ण आशियाला आश्चर्यचकित केले. ८५ च्या पातळीपासून मजबूत होत तो ८४ च्या पातळीवर पोहोचला. अहवालानुसार, मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २७ पैशांनी वधारून ८४.९६ वर पोहोचला, याला परदेशी निधीचा जोरदार ओघ, मजबूत देशांतर्गत डेटा आणि जागतिक तणाव कमी झाल्यामुळे पाठिंबा मिळाला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारतातील उत्पादन आणि औद्योगिक उत्पादनात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रुपया वर्षाच्या उच्चांकावरआंतरबँक परकीय चलन विनिमय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.०६ वर उघडला आणि आणखी वाढून ८४.९५ वर पोहोचला, मागील बंदच्या तुलनेत तो २८ पैशांनी वाढला. सुरुवातीच्या व्यवहारात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.१५ च्या सुरुवातीच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. सोमवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १८ पैशांनी वाढून ८५.२३ वर बंद झाला.

डॉलरचा निर्देशांक वाढलादरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी वाढून ९९.१८ वर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल ०.६८ टक्क्यांनी घसरून ६५.४१ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. देशांतर्गत शेअर बाजारात, ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ४०४.०० अंकांनी वाढून ८०,६२२.३७ वर पोहोचला, तर निफ्टी ११५.४० अंकांनी वाढून २४,४४३.९० वर पोहोचला.

वाचा - इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

रुपया वधारण्याची कारण?

  • विदेशी गुंतवणुकीचा ओघ : भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी अधिक रस दाखवल्यामुळे डॉलरचा पुरवठा वाढला आणि रुपया मजबूत झाला.
  • चांगले आर्थिक आकडे : भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधित सकारात्मक आकडेवारी (उदा. औद्योगिक उत्पादन वाढ, कमी झालेली बेरोजगारी) आल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि रुपयाला आधार मिळाला.
  • रिझर्व्ह बँकेची भूमिका : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रुपयाला आधार देण्यासाठी काही सकारात्मक पाऊले उचलली असू शकतात, जसे की डॉलरची विक्री करणे.
  • जागतिक बाजारातील घडामोडी : आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर कमजोर झाल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम रुपयावर दिसून आला.
  • कच्च्या तेलाच्या किमती : कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे भारताच्या आयात खर्चात बचत झाली. रुपया मजबूत होण्यामागे हे देखील कारण आहे.
टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारअमेरिका