Rupee at Record Low : जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आज तिहेरी फटका बसला आहे. गुरुवारी रुपयाने डॉलरच्या तुलनेत ९२ ही आजवरची नीचांकी पातळी गाठली, तर दुसरीकडे कमोडिटी बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सोन्याने १.८ लाखांचा टप्पा पार केला असून, चांदीने प्रथमच ४ लाख रुपये प्रति किलोचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
रुपयाची ऐतिहासिक घसरणआंतरबँक परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज ९१.९५ वर उघडला, मात्र महिन्याअखेर डॉलरची मागणी वाढल्याने तो ९२ प्रति डॉलर या ऐतिहासिक नीचांकी स्तरावर घसरला. जागतिक स्तरावर भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांमधून पैसे काढून सुरक्षित समजल्या जाणाऱ्या डॉलरमध्ये गुंतवणूक करत असल्याने रुपयावर दबाव वाढला आहे.
सोन्या-चांदीची विक्रमी भरारी
- मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली.
- चांदीचा नवा विक्रम : चांदीच्या मार्च वायदा करारात २२,०९० रुपयांची (५.७३%) वाढ होऊन ती ४,०७,४५६ रुपये प्रति किलोवर पोहोचली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने ४ लाखांचा आकडा पार केला आहे.
- सोन्याची झळाळी : सोन्याच्या दरात १४,५८६ रुपयांची (८.८%) मोठी वाढ झाली असून, तो १,८०,५०१ रुपये प्रति १० ग्रॅम या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
वाचा - ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास पुन्हा 'स्वस्त' होणार? बजेट २०२६ मध्ये रेल्वे सवलत सुरू करण्याचे संकेत
शेअर बाजारातही पडझड
- रुपयातील घसरण आणि जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारातही आज सकाळच्या सत्रात विक्रीचा दबाव दिसून आला.
- सेन्सेक्स : ३४३.६७ अंकांनी घसरून ८२,००१.०१ वर व्यवहार करत होता.
- निफ्टी : ९४.२० अंकांनी घसरून २५,२४८.५५ वर आला.
- परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ४८०.२६ कोटी रुपयांची खरेदी करूनही बाजारातील घसरण थांबवता आली नाही.
Web Summary : The rupee hit a record low of 92 against the dollar amid global uncertainty. Gold crossed ₹1.8 lakh, silver ₹4 lakh per kg. Stock markets also saw a downturn due to the rupee's fall and global cues.
Web Summary : वैश्विक अनिश्चितता के बीच रुपया डॉलर के मुकाबले 92 के रिकॉर्ड निचले स्तर पर पहुंचा। सोना ₹1.8 लाख, चांदी ₹4 लाख प्रति किलो पार। रुपये की गिरावट और वैश्विक संकेतों से शेयर बाजार में भी गिरावट आई।