Rubicon Research Listing: रुबिकॉन रिसर्च लिमिटेडची शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात झाली आहे. कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पुढे पोहोचले. रुबिकॉन रिसर्चचे शेअर्स गुरुवारी BSE मध्ये २७.८६ टक्के किंवा १३५.१० रुपयांच्या फायद्यासह ६२०.१० रुपयांवर लिस्ट झाले. तर, NSE वर रुबिकॉन रिसर्च लिमिटेडचे शेअर्स २७.८४ टक्के किंवा १३५ रुपयांच्या प्रीमियमसह ६२० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. आयपीओमध्ये रुबिकॉन रिसर्च लिमिटेडच्या शेअरचा दर ४८५ रुपये होता. कंपनीच्या पब्लिक इश्यूचा एकूण आकार १३७७.५० कोटी रुपयांपर्यंतचा होता.
लिस्टिंगनंतर घसरले शेअर्स
शानदार लिस्टिंगनंतर रुबिकॉन रिसर्च लिमिटेडच्या शेअर्समध्ये काही नफावसुली दिसून आली. लिस्टिंगच्या अगदी नंतर रुबिकॉन रिसर्चचे शेअर्स BSE मध्ये ४ टक्क्यांहून अधिकच्या घसरणीसह ५९० रुपयांवर पोहोचले. तर, एनएसईवर कंपनीचे शेअर्स ५८७.३५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेले. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये प्रमोटर्सची भागीदारी ७७.६७ टक्के होती. आयपीओमधून जमा केलेला निधी कंपनी आपले कर्ज फेडण्यासाठी आणि इनऑर्गेनिक ग्रोथ साठी वापरणार आहे.
आयपीओवर १०९ पटीहून अधिक बोली
रुबिकॉन रिसर्चच्या आयपीओवर एकूण १०९.३५ पट बोली लागली आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ३७.४० पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे. तर, कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत १७.६८ पट बोली लागली. रुबिकॉन रिसर्चच्या आयपीओमध्ये गैर-संस्थागत गुंतवणूकदारांचा कोटा १०२.७० पट सबस्क्राइब झाला. तर, पात्र संस्थागत खरेदीदार श्रेणीत १३७.०९ पट बोली लागली. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार किमान १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३० शेअर्स होते. म्हणजेच, सामान्य गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी १४,५५० रुपयांची गुंतवणूक करावी लागली.
कंपनी काय करते?
रुबिकॉन रिसर्च लिमिटेडची सुरुवात १९९९ साली झाली आहे. रुबिकॉन रिसर्च एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, रुबिकॉन रिसर्चच्या पोर्टफोलिओमध्ये यूएस एफडीए कडून मंजूर झालेले ७२ अॅक्टिव्ह अॅब्रीविएटेड न्यू ड्रग अॅप्लिकेशन आणि न्यू ड्रग अॅप्लिकेशन प्रॉडक्ट्स आहेत. रुबिकॉन रिसर्च लिमिटेड भारतात ३ उत्पादन सुविधा चालवते. याव्यतिरिक्त, कंपनीच्या २ यूएस एफडीए इन्स्पेक्टेड आर अँड डी सुविधा आहेत.
(टीप- यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Rubicon Research shares listed strongly, exceeding ₹600 with a 27% premium. The IPO, priced at ₹485, saw significant oversubscription. Shares later declined, but the company will use IPO funds to reduce debt and expand.
Web Summary : रुबिकॉन रिसर्च के शेयर 27% प्रीमियम के साथ ₹600 से ऊपर लिस्ट हुए। ₹485 की कीमत वाले आईपीओ को जबरदस्त प्रतिक्रिया मिली। बाद में शेयरों में गिरावट आई, लेकिन कंपनी आईपीओ फंड का इस्तेमाल कर्ज कम करने और विस्तार के लिए करेगी।