Join us

₹१ लाखांचे झाले ₹१२.४९ कोटी रुपये; मद्याच्या कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:30 IST

२९ सप्टेंबरपासून या शेअरला सातत्यानं अपर सर्किट लागत आहे.

Multibagger Stock Piccadily Agro: शेअर बाजारातील घसरण असो किंवा बंपर वाढ असो, हरियाणातील मद्याची कंपनी पिकाडिली ऍग्रो लिमिटेडचे ​​शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. सोमवारी बाजारात घसरण दिसून आली असली तर या कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं होतं. तर मंगळवारीही बाजारातील तेजीदरम्यान कंपनीच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागलंय. आज कंपनीचा शेअर 312.40 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर उघडला. 29 सप्टेंबरपासून या शेअरला सातत्यानं अपर सर्किट लागत आहे. एका महिन्यात स्टॉकमध्ये जवळपास 200 टक्के वाढ झाली. तर ज्या गुंतवणूकदारांनी सुरुवातीला या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या गुंतवणूकीचं मूल्य 12.49 कोटी रुपये झालंय.काही दिवसांपूर्वी पिकाडिली ऍग्रोला जगातील सर्वोत्कृष्ट सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक कंपनीचा पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं कंपनीच्या शेअर्समध्ये स्वारस्य वाढलंय. कंपनीच्या इंद्री दिवाळी 2023 एडिशनला सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडलाय.1 लाखाचे झाले 12.49 कोटीया शेअरनं गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. 1997 मध्ये 1 लाख गुंतवणार्‍या गुंतवणूकदारांनी जर आताही हा शेअर ठेवला असेल तर त्यांच्या 1 लाख रुपयांचं मूल्य आता 12.49 कोटी रुपये झालंय. यामध्ये तब्बल124,860.00 टक्क्यांची वाढ झाली आहे. पूर्वी कंपनीच्या एका शेअरची किंमत 25 पैसे होती.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक