Retail Investors Top 10 Invested Stocks: भारतीय शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदार पुन्हा एकदा सक्रिय झालेले दिसत आहेत. सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत या लहान गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपन्यांपासून ते नवीन स्टॉक्सपर्यंत मोठ्या प्रमाणात पैसा लावला. आकडेवारीनुसार, त्यांनी केवळ १० कंपन्यांमध्ये सुमारे १८,००० कोटी रुपये गुंतवले आहेत. बीएसई लिमिटेड (BSE Ltd) वर सर्वाधिक पैसा गुंतवण्यात आला आहे. याशिवाय, टीसीएस (TCS), ट्रेंट (Trent) सारख्या कंपन्यांमध्येही चांगला इन्फ्लो झाला आहे. न्यू एज कंपन्यांमध्ये ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी (Ola Electric Mobility) वर रिटेल गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवला आहे.
बीएसईमध्ये सर्वाधिक गुंतवणूक
प्राइम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार, बीएसईमध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी ६,०८९ कोटी रुपयांची मोठी रक्कम गुंतवली. विशेष म्हणजे, तिमाहीदरम्यान या शेअरची किंमत २६ टक्क्यांपर्यंत घसरली असतानाही ही गुंतवणूक झाली. अनेक अनुभवी गुंतवणूकदारांनी याला स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मानली आणि पोर्टफोलिओमध्ये सामील केले.
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
यानंतर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) रिटेल गुंतवणूकदारांची दुसरी पसंती ठरली, ज्यात ४,५३१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर, टाटा समूहाचीच दुसरी कंपनी ट्रेंट लिमिटेडमध्ये १,७५२ कोटी रुपयांची खरेदी दिसून आली.
न्यू एज कंपन्यांचंही आकर्षण
नवीन पिढीच्या गुंतवणूकदारांचे आकर्षण आता केवळ पारंपरिक कंपन्यांपर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. त्यांनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी मध्ये ७९३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यासोबतच केपीआर मिल (KPR Mill), सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy), श्रीराम फायनान्स (Shriram Finance) आणि एंजल वन (Angel One) मध्येही गुंतवणूक करण्यात आली.
या १० कंपन्यांमध्ये एकूण १८,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आली. यावरून हे स्पष्ट होते की, भारतीय रिटेल गुंतवणूकदार बाजारातील घसरण किंवा अस्थिरतेने घाबरणारे नाहीत. ते आता जुन्या कंपन्यांवर आणि नवीन कंपन्या, दोघांवरही सारखाच विश्वास दर्शवत आहेत.
रिटेल गुंतवणूकदारांनी कुठे केली नफावसुली?
दुसरीकडे, अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी नफावसुली देखील केली. एचडीएफसी बँक (HDFC Bank) मधून ९,३६१ कोटी रुपयांची विक्री झाली, जी या तिमाहीतील सर्वात मोठी विक्री ठरली. याशिवाय, अदानी पॉवरमधून २,२२९ कोटी रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधून १,७८७ कोटी रुपयांची विक्री नोंदवली गेली. टाटा स्टील (Tata Steel), नेस्ले इंडिया (Nestle India) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever) सारख्या स्टॉक्समध्येही गुंतवणूकदारांनी पैसा काढण्याचा निर्णय घेतला.
तरीही, भारतीय बाजारात रिटेल गुंतवणूकदारांचा प्रभाव सतत वाढत आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत NSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांमध्ये रिटेल गुंतवणूकदारांची भागीदारी आता मूल्याच्या दृष्टीनं ७.४३ टक्के आणि वॉल्यूमच्या आधारावर १६.३८ टक्के झाली आहे.
एक ट्रेंड हा देखील समोर आला की, रिटेल गुंतवणूकदार अनेकदा संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (म्युच्युअल फंड्स आणि एफआयआय) उलट चालतात. उदाहरणार्थ, जेव्हा म्युच्युअल फंडांनी मोठ्या स्टॉक्समध्ये त्यांची हिस्सा कमी केली, तेव्हा सामान्य गुंतवणूकदारांनी बीएसई, टीसीएस, आणि इन्फोसिस सारखे शेअर्स खरेदी केले. याला कॉन्ट्रेरियन दृष्टिकोन मानलं जात आहे, म्हणजे जेव्हा बाकीचे विकत आहेत, तेव्हा खरेदी करणं.
काय म्हणाले एक्सपर्ट?
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च हेड श्रीकांत चौहान यांच्या मते, “दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांची मागणी थोडी मंदावली होती, तर फॅशन, लक्झरी उत्पादनांसारख्या क्षेत्रात थोडी सुधारणा दिसली. बँकांची कर्ज वाढ सामान्य राहिली, तर मेटल्स आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.”
तर, पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे सीआयओ विनय पहाडिया यांचं मत आहे की, दीर्घकाळासाठी भारतीय बाजार अजूनही आकर्षक आहे. देशांतर्गत उपभोग, फायनान्शियल्स, हेल्थकेअर आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहेत. तर, आयटी, ऊर्जा आणि युटिलिटी सेक्टरमध्ये सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Retail investors invested ₹18,000 crore in 10 stocks, including BSE, TCS, and Suzlon, during the September 2025 quarter. BSE saw the highest inflow. Investors booked profits in HDFC Bank and others, showing confidence in both traditional and new-age companies.
Web Summary : खुदरा निवेशकों ने सितंबर 2025 तिमाही में बीएसई, टीसीएस और सुजलॉन सहित 10 शेयरों में ₹18,000 करोड़ का निवेश किया। बीएसई में सबसे ज्यादा निवेश हुआ। निवेशकों ने एचडीएफसी बैंक में मुनाफावसूली की, पारंपरिक और नए युग की कंपनियों पर भरोसा दिखाया।