Join us
Daily Top 2Weekly Top 5

झुनझुनवालांच्या पसंतीच्या स्टॉकची ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला गवसणी; एकाच दिवसात १०% ची उसळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:31 IST

Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांच्या मालकीच्या करूर वैश्य बँकेने या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३९ टक्के वाढ नोंदवली आहे. शिवाय, निव्वळ व्याज उत्पन्नात १४.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Rekha Jhunjhunwala : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील करूर वैश्य बँक या बँकेच्या शेअरने मंगळवारी बाजारात तुफान तेजी नोंदवली. बँकेने जाहीर केलेले दमदार तिमाही निकाल आणि एमडींच्या कार्यकाळ विस्ताराच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरवर उड्या घेतल्या. व्यवहारादरम्यान हा शेअर १० टक्क्यांहून अधिक वाढून २९२ रुपयांच्या पातळीवर पोहोचला, तर बँकेने २९४.४५ रुपयांचा आपला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला.

तिमाही निकालात नफ्याचा 'चौकार'बँकेने डिसेंबर २०२५ च्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बँकेच्या नफ्यात ३९% ची मोठी वाढ झाली असून तो ६९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कर्जातून मिळणाऱ्या उत्पन्नात १४.६२% वाढ होऊन ते १,२३९ कोटी रुपये झाले आहे. बँकेच्या एकूण कर्जांमध्ये १७% ची भरघोस वाढ झाली आहे.

बँकेची आर्थिक स्थिती मजबूतबँकेची अनुत्पादित कर्जे म्हणजेच 'एनपीए' अत्यंत कमी झाले आहेत. सध्या बँकेचा ग्रॉस एनपीए केवळ ०.७१% असून तो ऐतिहासिक नीचांकावर आहे. तसेच बँकेचा भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १६.०५% इतका मजबूत आहे, जो बँकेची जोखीम पेलण्याची क्षमता दर्शवतो.

बी. रमेश बाबू यांचा कार्यकाळ वाढणारबँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बी. रमेश बाबू यांच्या नेतृत्वावर बोर्डाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. २९ जुलै २०२६ पासून पुढील दोन वर्षांसाठी त्यांच्या फेरनियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. या स्थिर नेतृत्वामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.

वाचा - निर्मला सीतारमण यांचे 'सप्तर्षी'! अर्थसंकल्पाचा पाया रचणारे ७ दिग्गज अधिकारी कोण?

विदेशी गुंतवणूकदार आणि झुनझुनवालांचा विश्वासपरदेशी गुंतवणूकदारांनी आपली हिस्सेदारी १५.८०% वरून वाढवून १६.८७% केली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे बँकेचे ४.०१ कोटी शेअर्स (४.१६% हिस्सा) आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rekha Jhunjhunwala's favorite stock hits 52-week high, jumps 10%

Web Summary : Karur Vysya Bank's shares surged 10% to a 52-week high after strong quarterly results and MD's tenure extension news. The bank's Q3 profit rose 39% to ₹690 crore, with gross NPA at a historic low of 0.71%. Rekha Jhunjhunwala holds 4.16% stake in the bank.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकरेखा झुनझुनवाला