Join us

Tata च्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांनी २ दिवसांत कमावले ₹२६१ कोटी; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:52 IST

Rekha Jhunjhunwala Portfolio: सोमवारी सकाळी हा शेअर वधारला आणि एनएसईवर ३,६४२.५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर यात २७४.१५ रुपयांची वाढ नोंदवली गेली.

Rekha Jhunjhunwala Portfolio: गेल्या दोन सत्रात एनएसईवर टायटनच्या शेअरची किंमत (Titan Share Price) ३,३६८.४० रुपयांवरून ३,६४२.५५ रुपयांवर पोहोचली. अर्थसंकल्पानंतर या शेअरमधील तेजी कायम आहे. सोमवारी सकाळी हा शेअर वधारला आणि एनएसईवर ३,६४२.५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर यात २७४.१५ रुपयांची वाढ नोंदवली गेली. टाटा समूहाच्या या शेअरमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत सुमारे २६१ कोटी रुपयांची वाढ झाली.

झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ

टायटनच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचे कारण म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ड्युटी २५ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणण्याची केलेली घोषणा. टायटनच्या प्राईज हिस्ट्रीनुसार, हा शेअर शुक्रवारी एनएसईवर ३,३६८.४० रुपयांवर बंद झाला. शनिवारी विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान टायटन ३,५५२ रुपयांवर बंद झाला. टायटनच्या शेअरच्या भावात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली आणि हा शेअर ३,५६५ रुपयांवर पोहोचला.लाइव्ह मिंटने दिलेल्या माहितीनुसार, यामुळे रेखा झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओतील शेअर ३,६४२.५५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे टायटनच्या शेअरची किंमत दोन सत्रात २७४.१५ रुपयांनी वाढली.

झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे १.०८ टक्के म्हणजेच ९५,४०,५७५ शेअर्स आहेत. अर्थसंकल्पानंतरच्या तेजीमध्ये टायटनच्या शेअरची किंमत २७४.१५ रुपयांनी वाढली आणि रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत २,६१,५५,४८,६३६.२५ रुपये म्हणजेच २६१ कोटी रुपयांची वाढ झाली.

टायटनमध्ये एलआयसीचा हिस्सा

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ तिमाहीसाठी टायटनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीकडे टायटनचे १,९२,८६,५९० शेअर्स आहेत, जे या झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओ स्टॉकच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या २.१७ टक्के आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजार