Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:34 IST

पाहा कोणती आहे ही कंपनी आणि रेखा झुनझुनवालांची किती आहे गुंतवणूक, जाणून घ्या.

Rekha Jhunjhunwala Stock: ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी Escorts Kubota च्या स्टॉकमध्ये गुरुवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर्स २ टक्क्यांच्या वाढीसह ३७८२ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. या तेजीचं मुख्य कारण म्हणजे कंपनीनं डिसेंबर २०२५ साठी आपल्या बिझनेस अपडेटची माहिती शेअर केली आहे, ज्यानंतर स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांची रुची वाढली आहे.

कंपनीचे बिझनेस अपडेट

कंपनीनं सांगितलं की, एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडच्या ॲग्री मशिनरी बिझनेसनम डिसेंबर २०२५ मध्ये ७,५७७ ट्रॅक्टरची विक्री केली. डिसेंबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या ५,४७२ ट्रॅक्टरच्या तुलनेत ही ३८.५% ची वाढ आहे, जी विक्रीतील मजबूत तेजी दर्शवते.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

कंपनीने माहिती दिली की, डिसेंबर २०२५ मध्ये भारतात ट्रॅक्टरची विक्री ६,८२८ युनिट्सवर पोहोचली. डिसेंबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या ५,०१६ ट्रॅक्टरच्या तुलनेत ही ३६.१% ची वाढ होती. ट्रॅक्टर उद्योगाची कामगिरी चांगली राहिली कारण सरकारी पाठबळ, कमी जीएसटी आणि राज्य सबसिडीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अधिक परवडणारे झाले आहेत.

चांगलं पीक उत्पादन, शेतकऱ्यांनी गेल्या वर्षाच्या तुलनेत रब्बी पिकांची केलेली जास्त पेरणी, पाणीपुरवठ्यातील सुधारणा आणि ग्रामीण भागातील लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे उद्योगाची कामगिरी उत्तम राहिली असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या सर्व घटकांमुळे किरकोळ पातळीवर मागणी वाढली. या सर्व परिस्थिती अजूनही अनुकूल असल्यानं आगामी महिन्यांत उद्योगातील ही वाढ सुरूच राहील, अशी अपेक्षा कंपनीला आहे.

कंपनीनं सांगितलं की, डिसेंबर २०२५ मध्ये ट्रॅक्टरची निर्यात ७४९ युनिट्स राहिली. डिसेंबर २०२४ मध्ये निर्यात केलेल्या ४५६ ट्रॅक्टरच्या तुलनेत ही ६४.३% ची वाढ आहे.

रेखा झुनझुनवाला यांचा हिस्सा

विशेष म्हणजे या कंपनीत दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांचीही भागीदारी आहे. 'ट्रेंडलाईन'नुसार, सप्टेंबर २०२५ पर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचा १.५३ टक्के हिस्सा होता, जी १७ लाखांहून अधिक शेअर्सच्या बरोबरीची आहे.

कंपनी काय करते?

एस्कॉर्ट्स कुबोटा मुख्यत्वे कृषी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर इंजिन तयार करते. ही कंपनी बांधकाम आणि माती खोदण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे, साहित्य उचलण्यासाठी आणि हाताळण्यासाठी लागणारी उपकरणं, धातूच्या नळ्या, हीटिंग एलिमेंट्स आणि हायड्रॉलिक सिस्टीम देखील तयार करते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Rekha Jhunjhunwala Holds Over 1.7 Million Shares in Escorts Kubota

Web Summary : Escorts Kubota shares surged following a positive business update, reporting a 38.5% increase in tractor sales for December 2025. Rekha Jhunjhunwala holds a 1.53% stake in the company, equivalent to over 1.7 million shares.
टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक