Join us

रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 14:34 IST

Rekha Jhunjhunwala portfolio: भारतीय बेंचमार्क निर्देशांकात मंगळवारी सकाळच्या व्यवहारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम राहिली. याचाच फायदा झुनझुनवाला यांनाही झाला आहे.

Rekha Jhunjhunwala portfolio: भारतीय बेंचमार्क निर्देशांकात मंगळवारी सकाळच्या व्यवहारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम राहिली. आजकाल गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असताना काही दिग्गज गुंतवणूकदारही वाढत्या शेअर बाजारात भरघोस कमाई करत आहेत. रेखा झुनझुनवाला यात अव्वल स्थानी आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी आज प्रचंड नफा कमावला आहे. पाहूया कसा.

या शेअर्समुळे वाढली नेटवर्थ

त्यांच्या पोर्टफोलिओतील टायटन कंपनी आणि मेट्रो ब्रँड या दोन कंपन्यांचे शेअर्स आहेत. आज त्यांच्यात मोठी वाढ दिसून आली. टायटन कंपनीचा शेअर आज सकाळी ३,३१० रुपयांवर उघडला आणि १० मिनिटांतच ३,३३० रुपयांची पातळी ओलांडली. तर मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स १,१७७.१० च्या पातळीवर उघडले आणि लगेचच ते १,१८०.९५ प्रति शेअरच्या पातळीवर पोहोचले. मात्र, नंतर त्यांना ही पातळी टिकवून ठेवता आली नाही.

हे शेअरहोल्डिंग पॅटर्न

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच सप्टेंबर २०२४ पर्यंत झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ४,५७,१३,४७० शेअर्स आहेत. अशातच आज या शेअरमध्ये प्रति शेअर २० रुपयांची वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये ९५.५४ कोटींची वाढ झाली. तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर तिमाहीपर्यंत मेट्रो ब्रँडचे २,६१,०२,३९४ शेअर्स आहेत. त्यात वाढ झाल्यानं शेअरच्या किंमतीत १०.१८ कोटींची वाढ झाली.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारटाटा