Join us

एका शेअरवर ३ बोनस शेअर देणार 'ही' कंपनी, १० दिवसांनंतर रेकॉर्ड डेट; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:13 IST

Redtape Limited Bonus Share: कंपनीचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर ७४३.६५ रुपयांवर उघडला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक ७५०.२५ रुपये प्रति शेअर आहे.

Redtape Limited Bonus Share: लोकप्रिय कंपनी रेडटेप लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागचं कारण म्हणजे बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर करणं. कंपनी पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर बोनस म्हणून ३ नवीन शेअर्स देणार आहे.

फेब्रुवारीत रेकॉर्ड डेट

रेडटेप लिमिटेडनं काल म्हणजेच २३ जानेवारी रोजी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार पात्र गुंतवणूकदारांना २ रुपयांच्या फेस व्हॅल्युच्या प्रत्येक १ शेअरमागे ३ नवीन शेअर्स दिले जातील. कंपनीने ४ फेब्रुवारी ही या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील त्यांना ३ नवे शेअर्स मिळणार आहेत.

शेअर्समध्ये तेजी

रेडटेप लिमिटेडचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर ७४३.६५ रुपयांवर उघडला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक ७५०.२५ रुपये प्रति शेअर आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १.११ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर २०२५ मध्ये आतापर्यंत हा शेअर १५ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

रेडटेप लिमिटेडनं गेल्या वर्षभरात २३ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. याच कालावधीत सेन्सेक्स ७.४६ टक्क्यांनी वधारला आहे. रेडटेप लिमिटेडचा ५२ आठवड्यांतील उच्चांक ९८१.८० रुपये प्रति शेअर आणि ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ५३७.०५ रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप १०,३११.२४ कोटी रुपये आहे. ही कंपनी शूजपासून जॅकेटपर्यंत सर्व काही तयार करते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक