RDB Infrstructure and Power Shares : गेल्या काही काळापासून शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना 100, 200 नाही, तर तब्बल 3100 टक्के परतावा दिला आहे.
1 लाखाचे झाले 37 लाखया शेअरमध्ये ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले, त्याना तब्बल 37 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. आम्ही ज्या शेअर बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव RDB इन्फ्रास्ट्रक्चर पॉवर लिमिटेड आहे. या शेअर्सनी 5 वर्षात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षांत कंपनीचे शेअर्स 3100 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, 1 वर्षात 274 टक्के आणि गेल्या 6 महिन्यांत 103 टक्के परतावा दिला आहे.
एकास 10 शेअर्स मिळणारविशेष म्हणजे, या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 3100 टक्के परतावा दिल्यानंतर आता कंपनीचा शेअर 10 भागात विभागला जाणार आहे. म्हणजेच आता शेअरहोल्डरला प्रत्येक स्टॉकसाठी 10 मोफत शेअर्स मिळणार आहेत. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले की, गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला 1 इक्विटी शेअर दिला जाईल. हा 10 शेअर्समध्ये विभागला जाईल.
स्टॉकची आताची स्थिती काय आहे?आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर 1 टक्क्यांनी घसरून 550 रुपयांवर व्यवहार करत होते. आरडीबी शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 612.65 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांचा नीचांक 103.20 रुपये आहे. कंपनीच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे झाले तर ते 927 कोटी रुपये आहे. कंपनीचा व्यवसाय नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर, बिकानेर, सुरत, चेन्नई आणि गुवाहाटी या शहरांमध्ये वेगाने वाढत आहे.
कंपनी काय काम करते?RDB इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडची स्थापना 1981 मध्ये झाली. ही कंपनी देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट आणि सौर सेवा संबंधित कंपन्यांपैकी एक आहे. इतकंच नाही तर कंपनी हाय-राईज अपार्टमेंट्स, इंटिग्रेटेड टाऊनशिप्स, कामाची जागा आणि शॉपिंग मॉल्स बांधण्यात गुंतलेली आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)