RDB Infrastructure and Power Limited: आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडचे मायक्रोकॅप पेनी स्टॉक्स शेअर्स शुक्रवारी व्यवहारादरम्यान फोकसमध्ये होते. आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडच्या शेअर्सनं आज ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि ५४.३४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. अलीकडेच कंपनीनं शेअर १:१० रेशोमध्ये विभागला होता. विभाजनापूर्वी गुंतवणूकदारांना समभाग ठेवण्याची अखेरची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ होती. याचा मोठा परिणाम शेअरच्या किमतीवर झाला आहे.
आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चर अँड पॉवर लिमिटेडने लिक्विडिटी सुधारण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी १:१० स्टॉक स्प्लिट लागू केलं. या स्प्लिटअंतर्गत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरची प्रत्येकी १ रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या दहा शेअर्समध्ये विभागणी करण्यात आली. या शेअर विभाजनाची रेकॉर्ड डेट शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली होती.
तपशील काय आहेत?
पाच दिवसांत हा शेअर जवळपास ९० टक्क्यांनी घसरला होता, त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र, ही मोठी घसरण होऊनही गेल्या वर्षभरात या शेअरनं २६० टक्के मल्टीबॅगर परतावा दिलाय. फेब्रुवारीच्या अखेरीस या शेअरमध्ये मोठी विक्री झाली आणि २८ फेब्रुवारीपर्यंत ९० टक्क्यांची घसरण झाली. अलीकडील अस्थिरता असूनही, २०२५ मध्ये या शेअरमध्ये ९.६६% वाढ झाली. गेल्या १२ महिन्यांत या पेनी शेअरमध्ये २६० टक्क्यांची तेजी आली.
डिसेंबर तिमाही निकाल
आरडीबी इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर २०२४) मजबूत आर्थिक कामगिरी नोंदविली. कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीतील ०.९२ कोटी रुपयांच्या तुलनेत ८८.०४ टक्क्यांनी वाढून १.७३ कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत विक्री २५१.४५ टक्क्यांनी वाढून २४.१८ कोटी रुपयांवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष २०२३ च्या याच तिमाहीत ६.८८ कोटी रुपये होती. कंपनीनं सध्याच्या तिमाहीत ६७२.१६ कोटी रुपयांची एकूण विक्री नोंदविली. तिमाहीचं एकूण उत्पन्न ६७८.४१ कोटी रुपये होतं.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)