Join us

टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:03 IST

Rakesh Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल ४०० कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये १०% वाढ झाली आहे.

Rakesh Jhunjhunwala : अस्थिर शेअर बाजारातही काही गुंतवणूकदारांची कमाई थांबलेली नाही. यात बाजारातून प्रचंड संपत्ती निर्माण करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये दिवंगत 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. त्यांनी घेतलेले काही निर्णय त्यांच्यासाठी 'सुपर मल्टीबॅगर' ठरले, त्यापैकीच एक म्हणजे टाटा ग्रुपची टायटन कंपनी. टायटन कंपनीचे शेअर्स आजही झुनझुनवाला कुटुंबासाठी नफ्याचे मोठे कारण ठरत आहेत. केवळ एका दिवसातील शेअर्समधील हालचालीमुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अब्जावधींची वाढ होते.

एका दिवसात ₹४०० कोटींचा फायदाझुनझुनवाला कुटुंबाच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या टायटन कंपनीचे एकूण ४.५७ कोटी (४,५७,९३,४७०) शेअर्स आहेत. या शेअर्सचे एकूण मूल्य सुमारे १६,६७०.२० कोटी रुपये इतके प्रचंड आहे. गुरुवारी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये २.४५% ची तेजी दिसून आली आणि शेअर ३६३६ रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या २.४५% च्या वाढीमुळे, झुनझुनवाला कुटुंबाच्या टायटनमधील होल्डिंग व्हॅल्यूमध्ये एकाच दिवसात तब्बल ४०० कोटींची वाढ झाली. झुनझुनवाला कुटुंबाचा टायटनमधील हिस्सा एकूण ५.२०% इतका आहे.

यावरून स्पष्ट होते की, एका 'मल्टीबॅगर' स्टॉकमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची ताकद किती मोठी असते. टायटन कंपनी लिमिटेडचे ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे वित्तीय निकाल नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत. त्यापूर्वीच या शेअर्समध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. कंपनीने ९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या बिझनेस अपडेटमध्ये मजबूत वाढीचे संकेत दिले आहेत.

उत्पादक क्षेत्रातील वाढ: टायटन कंपनीच्या ग्राहक व्यवसायाने दुसऱ्या तिमाहीत २०% ची दमदार वार्षिक वाढ नोंदवली आहे.आंतरराष्ट्रीय व्यवसाय: कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात ८६% ची मोठी वाढ झाली आहे.नेटवर्क विस्तार: कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण ५५ नवीन स्टोअर्स उघडले आहेत, ज्यामुळे कंपनीचे संयुक्त किरकोळ नेटवर्क आता ३,३७७ स्टोअर्सपर्यंत पोहोचले आहे.

वाचा - सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?

या सकारात्मक व्यावसायिक आकडेवारीमुळे तिमाही निकालही चांगले येतील, या आशेने गुंतवणूकदारांनी सध्या टायटनच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू केली आहे. गेल्या सात ट्रेडिंग सत्रांपासून या स्टॉकमध्ये वाढ दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Titan Stock: Jhunjhunwala Family's Multibagger, Earns ₹400 Crore in a Day

Web Summary : Titan shares continue to benefit the Jhunjhunwala family. A 2.45% surge in Titan's stock price resulted in a ₹400 crore increase in their portfolio value in a single day. Strong business updates signal continued growth.
टॅग्स :राकेश झुनझुनवालाटाटाशेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक