Join us

शेअर बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीला मिळाली ₹ 699 कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये तुफान तेजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 18:11 IST

गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 40 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

Share Market: गेल्या काही काळापासून शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचा परिणाम काही ठराविक शेअर्सवर पाहायला मिळतोय. यात 'पीएनसी इन्फ्रा' कंपनीचा स्टॉक आहे. दरम्यान, एका मोठ्या ऑर्डरमुळे या शेअरवर गुंतवणुकदारांचे लक्ष गेले आहे. सोमवारी बाजार बंद होण्यापूर्वी कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली. यामुळेच या शेअर्समध्ये वादळी वाढ झाली. बीएसईवर हा शेअर 5.3 टक्क्यांनी वाढून 447.10 रुपयांवर व्यवहार करत आहे.

पीएनसी इन्फ्राने आपल्या मार्केट फायलिंगमध्ये म्हटले की, कंपनीला मध्य प्रदेशातून 699 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD कडून ही ऑर्डर मिळाली आहे. याअंतर्गत कंपनीला 4 लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करायचा आहे. ही ऑर्डर  36 महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे.

कंपनीच्या शेअरने गेल्या काही महिन्यांमध्ये चांगला परतावा दिला आहे. 26 फेब्रुवारीला शेअर सुमारे 6 टक्क्यांनी वाढून बंद झाला. इन्फ्रा स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, 1 वर्षात 60 टक्के परतावा मिळाला आहे. विशेष म्हणजे, दीर्घकालीन गुंतवणुकदारांनी 5 वर्षात 250 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवलाय.

(टीप- शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीची आहे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक