Join us

ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:49 IST

Donald Trump Tariff : ट्रम्प यांनी औषधांवर १००% कर लादला आहे, ज्याचा परिणाम आज भारतीय बाजारपेठेत दिसून येत आहे. अनेक भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

Pharma Stocks Collapse : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताला या ना त्या कारणाने दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. एच-१एबी व्हिसाची फी वाढवल्यानंतर आता ट्रम्प यांनी भारतीय फार्मा क्षेत्राला लक्ष्य केलं आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी रात्री उशिरा फार्मासह अनेक भारतीय क्षेत्रांवर १०० टक्के टॅरिफ (शुल्क) लावण्याची घोषणा केली. या भू-राजकीय निर्णयाचा थेट आणि मोठा परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला. आज सकाळपासूनच बाजार मोठ्या दबावाखाली असून, फार्मा आणि आयटी क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली.

सेन्सेक्स ४१२.६७ अंकांनी कोसळून ८०,७४७.०१ वर तर निफ्टी ११५ अंकांनी घसरून २४,७७६ वर व्यवहार करत आहे. या मोठ्या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांना सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव का?भारत हा जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषध उत्पादक देश आहे आणि जगातील 'फार्मसी ऑफ द वर्ल्ड' म्हणून ओळखला जातो. ट्रम्प यांनी फार्मावर १००% टॅरिफ लावण्याची घोषणा करणे, हा भारतीय कंपन्यांना अमेरिकेतील बाजारात स्पर्धा करण्यापासून रोखण्याचा आणि भारतावर दबाव आणण्याचा थेट प्रयत्न आहे.यापूर्वीच्या एच-१बी व्हिसा धोरणामुळे आयटी क्षेत्रावर दबाव आला होता, आता फार्मा क्षेत्राला टार्गेट करून ट्रम्प प्रशासन अमेरिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या भारतीय क्षेत्रांवर आर्थिक निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहे.

फार्मा क्षेत्रात मोठी पडझड

  • ट्रम्प यांच्या या टॅरिफ घोषणेचा सर्वात मोठा फटका फार्मा क्षेत्राला बसला आहे.
  • आज फार्मा क्षेत्रीय निर्देशांक १.८० टक्क्यांनी तुटला आहे.
  • मोठे अमेरिकेतील एक्सपोजर असलेले सन फार्मा (३.८% घसरण), ल्युपिन (३% घसरण), सिप्ला, अरबिंदो फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब (DRL) आणि बायोकॉन सारखे शेअर्स आज गडगडले.
  • आयटी (१.३०% घसरण) आणि हेल्थकेअर (१.५०% घसरण) क्षेत्रावरही मोठा दबाव कायम राहिला.
  • बीएसई टॉप ३० शेअर्समध्ये सन फार्मा सर्वाधिक घसरलेला शेअर होता. यासोबतच इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि एशियन पेंट्स सारखे २५ हून अधिक शेअर्स लाल निशाणीवर व्यवहार करत होते.

वाचा - पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

गुंतवणूकदारांचे ₹३ लाख कोटी बुडालेशेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले.बीएसई मार्केट कॅपिटलायझेशन कालच्या ४५७ लाख कोटी रुपयांवरून कमी होऊन आज ४५४ लाख कोटी रुपये झाले, म्हणजेच गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये एका दिवसात कमी झाले.बाजारातील एकूण ३,०७३ शेअर्सपैकी २,०६२ शेअर्समध्ये घसरण होती, तर केवळ ८६४ शेअर्समध्ये तेजी होती.नकारात्मकतेमुळे ८८ शेअर्सनी आज त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. यावरून बाजारातील नकारात्मक वातावरण किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's Tariff Bomb: Pharma Stocks Crash, ₹3 Lakh Crore Loss

Web Summary : Trump's tariff announcement on Indian pharma caused market turmoil. Pharma and IT stocks plummeted, leading to a ₹3 lakh crore loss for investors. Sun Pharma and Lupin shares were hit hardest.
टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाशेअर बाजार