Join us

रॉकेट बनला हा ३.६७ रुपयांचा शेअर; ५ वर्षांत दिला १५००% हून अधिकचा बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:33 IST

Penny Stock: या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Penny Stock: इस्रायल-इराण युद्ध थांबल्यामुळे शेअर बाजाराने दमदार कमबॅक केले आहे. यामुळेच मंगळवारी रॅटनइंडिया एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ७ टक्क्यांहून अधिकच्या वाढीसह हा शेअर ६१.५० रुपयांवर व्यवहार करत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे २७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच, पाच वर्षांत रॅटनइंडिया एंटरप्रायझेसच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना तब्बल १५०० टक्क्यांहून अधिकचा परातावा दिला आहे. 

रॅटनइंडिया उपकंपनीने एक मोठा टप्पा गाठलारॅटनइंडिया एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी आणि देशातील आघाडीची इलेक्ट्रिक बाईक ब्रँड रिव्हॉल्ट मोटर्सने एक मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने हरियाणातील मानेसर येथील त्यांच्या उत्पादन प्रकल्पातून ५०००० वी इलेक्ट्रिक बाईक तयार केली. रिव्हॉल्ट मोटर्सने इलेक्ट्रिक विभागात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. कंपनीच्या प्रमुख मॉडेल्समध्ये RV400, RV1+ आणि RV BlazeX बाईक्सचा समावेश आहे.

कंपनीचे शेअर्स पाच वर्षांत १५००% ने वाढलेगेल्या पाच वर्षांत रतनइंडिया एंटरप्रायझेस लिमिटेडच्या शेअर्समध्ये १५००% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. २६ जून २०२० रोजी स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स ३.६७ रुपयांवर होते. तर, आज हे शेअर्स ६१.५० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या २ वर्षांबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या शेअर्समध्ये ४७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये २५ टक्क्यांहून अधिक घसरणही झाली आहे. रतनइंडिया एंटरप्रायझेसच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ९२.१० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३७.४५ रुपये आहे.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक