Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ३ रुपयांचा शेअर ₹३०० पार; ₹१ लाखाचे केले ₹१ कोटी, गुंतवणूकदार मालामाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:19 IST

२० मार्च २०२० रोजी कंपनीचा शेअर फक्त ₹३.०४ वर होता.

Penny Stock: एकेकाळी पेनी स्टॉक म्हणून ओळखली जाणारी Transformers and Rectifiers (India) Limited कंपनी आता गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे. गेल्या ६ वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. 

६ वर्षांत १०० पट वाढ

२० मार्च २०२० रोजी कंपनीचा शेअर भाव केवळ ₹३.०४ होता. त्या वेळी एखाद्या गुंतवणूकदाराने ₹१ लाख गुंतवले असते, तर त्याला सुमारे ३२,८९४ शेअर्स मिळाले असते. आज, २३ एप्रिल २०२६ रोजी हा शेअर ₹३२० वर बंद झाला. सध्याच्या दरानुसार या शेअर्सची किंमत सुमारे ₹१.०५ कोटी इतकी झाली आहे.

मल्टीबॅगर परफॉर्मन्स

५ वर्षांत: तब्बल ३५४४% वाढ४ वर्षांत: सुमारे १५९३% वाढ३ वर्षांत: सुमारे ८७८% वाढ

बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट

कंपनीने गुंतवणूकदारांना वेळोवेळी बोनस शेअर्सही दिले आहेत. जून २०१३ मध्ये १:९ बोनस (प्रत्येक ९ शेअर्सवर १ बोनस), तर फेब्रुवारी २०२५: १:१ बोनस (प्रत्येक १ शेअरवर १ बोनस) मिळाले आहेत. तसेच, कंपनीने सप्टेंबर २०१७ मध्ये स्टॉक स्प्लिट करून ₹१० फेस व्हॅल्यूचा शेअर ₹१ फेस व्हॅल्यूच्या १० शेअर्समध्ये विभागला होता. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹५९४.८० असून, कंपनीचे मार्केट कॅप ₹९,६०० कोटींपेक्षा अधिक आहे.

शेअरहोल्डिंग पॅटर्न

प्रमोटर हिस्सा: ६४.३६%सार्वजनिक हिस्सा: ३५.६४%

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Penny Stock Soars: ₹3 to ₹300, Investors Reap Crores

Web Summary : Transformers and Rectifiers turned multi-bagger, delivering massive returns. A ₹3.04 share in 2020 reached ₹320 by 2026, transforming a ₹1 lakh investment into ₹1.05 crore. The company issued bonus shares and split stocks, boasting a market cap exceeding ₹9,600 crore.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक