Penny Stock: शेअर बाजारात योग्य शेअर निवडणे सोपे नसते. मात्र योग्य वेळी आणि योग्य शेअरमध्ये गुंतवणूक झाली, तर अल्पावधीत मोठा परतावा मिळू शकतो. अशाच एका पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेत. विशेष म्हणजे, ही कंपनी स्मॉल-कॅप श्रेणीत मोडत असून, तिचे मार्केट कॅप सुमारे 1,366 कोटी रुपये आहे.
5 वर्षांत 3,766% रिटर्न
RDB Infrastructure and Power या कंपनीच्या शेअरने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. या शेअरने मागील 5 वर्षांत तब्बल 3,766 टक्के परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास 38 पट वाढला आहे.
उदाहरणार्थ, 5 वर्षांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 50 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीची किंमत 19 लाख रुपयांहून अधिक झाली असती. या कालावधीत शेअरचा भाव 1.59 रुपयांवरून सुमारे 64 रुपयांपर्यंत पोहोचला.
3 वर्षांतही जबरदस्त कामगिरी
5 वर्षेच नव्हे, तर मागील 3 वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 1,536% चा परतावा दिला आहे. म्हणजेच, एखाद्याने तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली अशती, तर त्याला 16.36 लाख रुपये मिळाले असते.
काय करते RDB Infrastructure and Power?
RDB Infrastructure and Power ही एक रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी असून, ती संपूर्ण भारतभर आपले कामकाज करते. ही कंपनी RDB Group चा भाग आहे. RDB Group चे व्यवसाय क्षेत्र पॅकेजिंग, पॉवर, टेलिकॉम ट्रान्समिशन इक्विपमेंट, रिटेल चेन, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.)
Web Summary : RDB Infrastructure and Power's stock gave massive returns, turning ₹50,000 into ₹19 lakhs in five years. The small-cap company, active in real estate, delivered 3,766% returns, showcasing the potential of penny stocks. However, investment involves risk.
Web Summary : आरडीबी इंफ्रास्ट्रक्चर एंड पावर के स्टॉक ने शानदार रिटर्न दिया, जिससे पांच साल में ₹50,000, ₹19 लाख में बदल गए। रियल एस्टेट में सक्रिय इस स्मॉल-कैप कंपनी ने 3,766% रिटर्न दिया, जो पेनी स्टॉक की क्षमता को दर्शाता है। निवेश में जोखिम शामिल है।