Join us

Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:08 IST

Paytm Stock Price: डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएमचा शेअर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात १० टक्क्यांनी घसरला.

Paytm Stock Price: डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएमचा शेअर गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात १० टक्क्यांनी घसरून ८६४.४० रुपयांवर व्यवहार करत होता. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) लागू करण्याबाबतच्या शक्यता फेटाळून लावल्यानंतर गुंतवणूकदारांनी पेटीएमच्या शेअर्सची विक्री सुरू केली. कामकाजादरम्यान पेटीएमच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव इतका वाढला होता की, त्याची किंमत ८६४.२० रुपयांपर्यंत घसरली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीनंतर या शेअरमध्ये एका दिवसातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पेटीएमचे शेअर्स खूप चर्चेत होते.

खरं तर, यूपीआय व्यवहारांवरील मर्चंट डिस्काऊंट रेट पुन्हा लागू करण्याचा विचार सरकार करू शकते, ज्यात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त यूपीआय व्यवहारांसाठी स्वतंत्र शुल्क भरावं लागेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, अर्थ मंत्रालयाने बुधवारी एमडीआरशी संबंधित अंदाज खोटे, निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून यूपीआय पेमेंटवर कोणताही एमडीआर आकारला जाणार नाही, असं अर्थ मंत्रालयानं सोशल मीडिया पोस्ट एक्सद्वारे म्हटलंय.

डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 

एमडीआर लागू झाल्यास काय होईल?

तीन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर एमडीआर लागू होऊ शकतो, असं वृत्त काही माध्यमांद्वारे समोर आलं होतं. एमडीआर लागू झाल्यामुळे यूपीआय व्यवहारांवर स्वतंत्र शुल्क भरावं लागतं. परंतु सरकारनं एमडीआर लागू करण्यास स्पष्ट नकार दिलाय. २०२० पासून यूपीआय व्यवहारांवर शून्य एमडीआर आहे. यूपीआयमधून तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त १ लाख रुपयांचे व्यवहार करू शकता. काही प्रकरणांमध्ये यूपीआयची ही मर्यादा जास्त असू शकते. कॅपिटल मार्केट, इन्शुरन्स सारख्या बाबतीत ही मर्यादा २ लाख रुपये आहे. तर कर, शैक्षणिक शुल्क, रुग्णालयांमध्ये पैसे भरण्यासाठी ही मर्यादा पाच लाख रुपये आहे.

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार