Join us  

अंबानींना हिस्सा विकणार ही कंपनी? ₹९० च्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 12:25 PM

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आणखी एका अमेरिकन मीडिया ग्रुपचा भारतीय व्यवसाय विकत घेऊ शकते.

मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) दुसऱ्या अमेरिकन मीडिया ग्रुपचा भारतीय व्यवसाय विकत घेण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या मीडिया ग्रुप पॅरामाउंट ग्लोबलनं रिलायन्स इंडस्ट्रीजशी भारतातील मीडिया जॉइंट व्हेंचर स्टेक विकण्यासाठी चर्चा केली आहे. हा संवाद अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. असा अंदाज आहे की भागभांडवल विक्रीतून पॅरामाउंट ग्लोबलला 550 डॉलर्स पर्यंत उत्पन्न मिळू शकेल. कंपनी ही रक्कम कर्ज कमी करण्यासाठी वापरू शकते. पॅरामाउंट ग्लोबल रिलायन्स इंडस्ट्रीज 'व्हायकॉम18' च्या संयुक्त उपक्रमाच्या सहकार्यानं भारतीय मीडिया उद्योगात सक्रिय आहे. या संयुक्त उपक्रमाची कंपनी शेअर बाजारात NETWORK18 Media and Investment Limited या नावानं लिस्ट आहे. 

शेअरवर परिणाम 

पॅरामाउंटच्या स्टेक विक्रीबाबत ब्लूमबर्गच्या रिपोर्टनंतर NETWORK18 Media and Investment Limited च्या शेअर्समध्ये वादळी वाढ झाली. गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी, कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अपर सर्किटवर गेले आणि 94.90 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी बुधवारी कंपनीचे शेअर्स 90.40 रुपयांवर बंद झाले होते होता. हा शेअर 19 जानेवारी 2024 रोजी कंपनीच्या शेअर्सनं 136.20 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही.  कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजार