Join us

₹38 वरुन ₹1 वर आला हा स्टॉक; गुंतवणूकदार तुटून पडले, 10% चे अप्पर सर्किट लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 14:38 IST

Penny Stock : शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

Penny Stock : शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. Panafic Industrials Ltd, असे या शेअरचे नाव आहे. कंपनीचे शेअर्स सोमवारी 10% नी वधारले. सध्या हा शेअर 1.65 रुपयांवर पोहोचलाआहे. 

विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात या शेअरने 35% आणि या वर्षी आतापर्यंत 50% परतावा दिला आहे. दीर्घकालीन परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत 27%, एका वर्षात 70% आणि पाच वर्षांत 400% मजबूत परतावा दिला आहे. पण, हा शेअर गेल्या काही वर्षांमध्ये खुप घसरला आहे. 2015 मध्ये या शेअरची किंमत 38 रुपये होती. म्हणजेच, सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर 95% ने घसरला आहे. दरम्यान, या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी 2.02 रुपये आणि 52 आठवड्यांची निच्चांकी 0.83 रुपये आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 13.55 कोटी रुपये आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक